Couple bike stunt viral SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video : हद्द झाली राव! धावत्या बाईकवर कपलचा रोमान्स, भरचौकात अश्लील चाळे, गर्लफ्रेंड टाकीवर बसली अन्...

Couple bike stunt viral: सोशल मीडियावर कपलचा बाईकवर एक अश्लिल चाळे करणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे रोड सेफ्टीबाबत चर्चा सुरू झाली आहे. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या तर अनेकांनी या कृत्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियाच्या जगात दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करतात तर काहींमुळे वादही निर्माण होतात. सध्या अशाच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलीये. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी बाइकवर अत्यंत विचित्र आणि धोकादायक पद्धतीने बसलेले दिसतायत.

विशेष म्हणजे, या विचित्र पोझमध्ये असतानाच तरुण रस्त्यावर बाइक चालवताना दिसतोय. ज्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली असून हे चुकीचं असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील mr.nadan_parinda या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलंय. हजारो लोकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. रस्त्यावरच्या वाहतुकीदरम्यान असा स्टंट केल्याने अपघाताचा धोका वाढू शकतो, असं मत काहींनी व्यक्ती केलंय.

व्हिडिओमध्ये तरुण-तरुणी बाइकवर एकमेकांकडे तोंड करून बसलेले दिसतात. हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय, तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. या व्हिडीओमध्ये सिग्नलवर एक बाईकवर तरूण बसलाय. त्याच्या अगदी चेहऱ्याच्या समोर एक तरूणी बसलेली दिसतेय. बाईक थांबलेली असताना तरूणीने त्याला मीठी मारल्याचंही दिसतंय. त्यानंतर तो तरूण पुन्हा बाईक सुरु करून निघून जातात.

युजर्सने दिल्या विविध प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर आपलं मत नोंदवलंय. यावेळी एका युजरने त्यांची मजा घेत म्हटलंय की, प्यार के दिवाने...तर अजून एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, हे कृत्य चुकीचं असून यांनी पोलिसांनी अटक केली पाहिजे.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हिंदी सक्ती! पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटणार?

तमिळनाडूत मोठा राजकीय भूकंप! थलापती विजय यांना हादरा? आता पर्याय काय? डीएमके बाजी उलटवणार

SCROLL FOR NEXT