Viral Video: लग्नाच्या सेलिब्रेशनदरम्यान विपरीत घडलं; नवरा-नवरी बाल्कनीतून खाली पडले, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ

Wedding celebration accident: एका लग्नसोहळ्यात आनंदाचं वातावरण अचानक गंभीर बनलं. वधू-वर बाल्कनीवरून खाली पडल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Wedding celebration accident
Wedding celebration accidentsaam tv
Published On

लग्न हा दिवस प्रत्येकासाठी एकदम खास असतो. तो दिवस लक्षात राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. या दिवशी उत्साह, आनंद, संगीत आणि लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. या दिवसी नवरा आणि नवरी एका नवीन प्रवासाला सुरुवात करतात. परंतु कधीकधी या आनंदी वातावरणात मिठाचा खडा पडतो. अशीच एक लग्नाची घटना सोशल मीडियावर व्हायरल झालीये.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक मोठा धक्का हादरा नक्कीच बसेल. व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते एका अपघातापेक्षा कमी नाहीये.

Wedding celebration accident
Viral Video: धावत्या बाइकवर मारहाण! बायकोनं 27 सेकंदात नवऱ्याला 14 वेळा कानाखाली मारल्या

काय घडलंय या व्हिडीओमध्ये?

लग्नाच्या उत्सवादरम्यान नवरा -नवरी आणि त्यांचे पाहुणे एका इमारतीच्या बाल्कनीत उभे दिसतात. सर्वजण आनंदी आहेत तर नवरी खाली उभ्या असलेल्यांना हात हलवून प्रतिसाद देतेय. हे सगळे क्षण कॅमेरात टिपले गेलेत. वातावरण आनंदी असताना क्षणात ते बदलताना दिसतंय. अचानक बाल्कनीचा पुढचा भाग कोसळतो आणि त्याठिकाणी असलेले सर्वजण खाली पडतात.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, दुर्घटना घडल्यावर कोणालाही सावरण्याची संधी मिळत नाही. बाल्कनीत उभे असलेले सर्वजण अगदी नवरा-नवरीसह थेट खाली पडतात. हे दृश्य इतकं अचानक आणि भयानक आहे की, व्हिडिओ पाहणाऱ्यांना देखील धडकी भरली असेल. हा अपघात फार भयानक असल्याचं दिसून येतंय.

Wedding celebration accident
Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

कोणीतरी हे संपूर्ण प्रकरण लांबूर रेकॉर्ड केल्याचं समजतंय. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि तो लगेच व्हायरल झाला. हा व्हिडिओ @GoldBellClips नावाच्या अकाउंटने X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युझर्सही घाबरले होते. मात्र त्यानंतर हा व्हिडिओ एआय-जनरेटेड असल्याचा दावा करण्यात आलाय.

Wedding celebration accident
Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

(डिस्क्लेमर- या बातमीमध्ये वापरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची आम्ही खातरजमा करत नाही)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com