Cylinder Blast Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तुमच्या किचनमध्ये मोबाईल 'बॉम्ब', मोबाईलमुळे सिलिंडरचा स्फोट? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Cylinder Blast Viral Video: आता सगळ्या गृहिणीवर्गासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी..तुम्ही जर किचनमध्ये मोबाईल वापरत असाल तर सावधान. कारण तुमच्या हातात मोबाईल नाही तर टाईम बॉम्ब असल्याचा दावा सोशल मीडियातून केला जातोय.

Mayuresh Kadav

मोबाईल हा आपल्या जीवनाचा भाग बनलाय. आपण कुठेही गेलो तरी मोबाईल आपल्यासोबत असतोच. गृहिणीतर किचनमध्ये सर्रासपणे मोबाईलचा वापर करतात. स्वयंपाक बनवताना कानाला फोन लावून गप्पा मारणं हा अनेक गृहिणींचा जणू छंदच बनलाय. मात्र सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओनं गृहिणीवर्गाची झोप उडवलीय.

या व्हिडीओत किचनमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होताना दिसतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. या स्फोटाला मोबाईलचा वापरच कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येतोय. व्हायरल मेसेजमध्ये काय म्हंटलंय ते जाणून घेऊ...

व्हायरल मेसेज

तुम्ही तुमच्या गॅस शेगडीजवळ मोबाईल ठेऊ नका. किचनमध्ये मोबाईलवर बोलू नका. नाहीतर या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो.

या व्हिडीओमुळे महिलांमध्ये भीतीची लाट पसरलीय. किचनमध्ये मोबाईलचा वापर करायचा की नाही, याबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झालाय. किचनमध्ये मोबाईल वापरल्यानं स्फोट होतो का? मोबाईल वापरणं खरंच घातक आहे का? हे सवाल उपस्थित झाल्यानं साम टीव्हीनं या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली. आम्ही या व्हिडीओचं मूळ शोधण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च वैशिष्ट्यांचा वापर केला. प्रत्येक फ्रेम पडताळून पाहिली. तेव्हा काय सत्य समोर आलं.

व्हायरल सत्य

ही घटना 6 जूनला पश्चिम जकार्तामधल्या दुरी कोसंबी गावात घडली असून स्फोटावेळी एक महिला किचनमध्ये काम करत होती. त्याचवेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा गॅस सिलिंडर आणि रेग्युलेटरचा पाईप योग्यरित्या न जोडल्यानं हा स्फोट झाल्याचं समोर आलं. सिलिंडरजवळ मोबाईल असल्यानं स्फोट झाल्याचं कारण कुठेही समोर आलं नाही.

याविषयी इलेक्ट्रिक तज्ज्ञ अधिक चांगली माहिती देऊ शकतात. त्यामुळे आम्ही त्यांच्यांशीही संवाद साधला. तेव्हा तज्ज्ञांनी सांगितलं की, मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बॅटरी असते. मात्र या बॅटरीचे व्होल्टेज रेटिंग फार कमी असतं. ही बॅटरी सिलिंडर तसच गॅस शेगडीच्या संपर्कात आली तरी स्फोट होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. मोबाईलमधील इलेक्ट्रॉनिक्स सर्किट छोटी असतात. त्यांची क्षमता 3 व्होल्ट किंवा त्यापेक्षा कमी असते.

याचाच अर्थ किचनमध्ये मोबाईलचा वापर केल्यास स्फोट होऊ शकतो हा दावा असत्य ठरलाय. संभ्रम पसरवण्यासाठी हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय. तरी तुम्ही या व्हिडीओवर विश्वास ठेऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का?  'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

SCROLL FOR NEXT