Video Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

Video Viral: मुंबईकर धन्यवाद!, कामाला जाणाऱ्या तरूणाचं 'ते' कृत्य पाहून मराठा आंदोलनकांनी केलं तोंडभरून कौतुक, VIDEO

मुंबईत मराठा आंदोलन सुरू असताना कामावर जाणाऱ्या एका तरुणाने आपला डब्बा आंदोलकांना दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आले आहेत. मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. हजारो कार्यकर्ते मनोज जरांगेसह मुंबईत आले आहेत. सोशल मीडियावर मराठा आंदोलनाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. मुंबईत आंदोलकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

काल सकाळी मनोज जरांगे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी मुंबईत आले. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र मुंबईत आल्यानंतर आंदोलकांची मोठी गैरसोय झाली असल्याची तक्रार आंदोलक करत आहे. अनेक शौचालये, हॉटेल्स बंद असल्याची तक्रार आंदोलक करत आहेत.

यामुळे सीएसएमटी रेल्वेस्थानकात आंदोलकर्त्यांनी खाली बसत अखेर आराम केला आहे. तेथेच त्यांनी जेवण देखील केलं आहे. याचदरम्यान कामाला जाणाऱ्या एका तरूणाने स्वत:चा डब्बा या आंदोलकांना दिला आहे ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मिडिया इनस्टाग्रामवर @shubham_jarange_patil23 या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. 'मुंबईकर बांधव कामावर जातांना स्वतःचा डब्बा बांधवाना देऊन गेलाय.'धन्यवाद मुंबईकर' असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओ लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT