Saam Tv
व्हायरल न्यूज

जीवाची पर्वा न करता जोडप्याचं थरारक प्री-वेडिंग शूट; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहा

Shocking Pre Wedding Shoot: लग्न जमल्यानंतर अनेक कपल प्री वेंडिग फोटो शुट करण्यासाठी धडपडत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ही एका कपलचा आहे. मात्र हे प्री वेडिंग फोटो शूट पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे.

Tanvi Pol

Pre Wedding Shoot video: पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांस्कृतिक बैठक आणि साखरपुडा, मंगलाष्टक, साडी-शेरवानी, आणि काहीसे फोटो. मात्र आजच्या डिजिटल युगात लग्नाआधीच फोटोशूटचा एवढा अतिरेक झाला आहे की, त्याला 'प्री-वेडिंग फिल्म' असं म्हणावं लागेल! फोटो घेणं यात गैर काही नाही. मात्र, हल्ली जी पद्धत सुरू झाली आहे, ती खरंच थरकाप उडवणारी आहे.

एका काळी बागेत, समुद्रकिनारी किंवा साध्या स्टुडिओमध्ये जोडपी फोटो काढत होते. पण आता गोष्ट आलीये उंच डोंगरांवर, रेल्वे(Railway) ट्रॅकवर, धबधब्याच्या कड्यावर, अगदी भर पावसात वीज कोसळताना फोटोशूट करण्यापर्यंत. काही लोक तर ड्रोन, हेलिकॉप्टर आणि मोठमोठ्या सिनेमॅटिक सेटअप्स वापरून संपूर्ण "लव स्टोरी" बनवतात. हे सर्व बघून असंच वाटतं की लग्न आधी 'ऍक्शन सीन' घेत आहेत.

समाज माध्यमांवर अनेक प्रकरणं समोर आली आहेत, जिथे प्री-वेडिंग शूट करताना अपघात घडले. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले जोडपे, ट्रॅकवर फोटो घेताना मृत्यू, किंवा डोंगरावरून घसरून झालेल्या दुर्घटना या गोष्टी आता दुर्दैवाने सामान्य झाल्या आहेत. त्या एका 'परफेक्ट फोटो'च्या नादात आयुष्याची खेळी नको खेळू. मात्र सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे एका नव्या जोडप्यांनी दरीमध्ये केलेले प्री वेडिंग फोटो शुट केले आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संताप

सोशल मीडियावर या जोडप्यांचा प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ(Video) व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून त्यावर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''तुम्ही संसार पण त्या जाळीवरच करा आणि तिथे जाळीवरच राहायला जा'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''असे करून काय मिळते'' तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: जोडप्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT