CCTV Footage Saam Digital
व्हायरल न्यूज

CCTV Footage: बँडमिंटन खेळताना धाडकन् कोसळला, खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, VIDEO आला समोर

Viral Cctv Footage: भारतीय वंशाच्या एका व्यक्तीचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. ज्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Man Collapses While Playing Badminton

सध्या दिवसेंदिवस प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यायाम करताना किंवा जेवण करताना हार्ट अटॅक येऊन व्यक्तीचा जीव गेल्याची बातम्या आपण वाचल्या असतील.ओमान देशातील मस्कटमध्ये एक अशीच एक घटना घडलीय. बॅडमिंटन खेळत असताना भारतीय वंशाच्या एका व्यक्तीचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. ज्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही दुर्दैवी घटना ओमान देशातील मस्कटमधील(Muscat)आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, चार व्यक्ती बॅडमिंटन कोर्टमध्ये खेळताना दिसत आहेत. बॅडमिंटन नेटच्या एका बाजूला दोन व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला दोन व्यक्ती आहेत. चौघांचा व्यवस्थित असा खेळ सुरु आहे. उपस्थित असलेल्या मित्रांना काही कळण्याच्या आतच तो खाली पडला. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या १० सेकंदातच या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला पाहून अन्य त्याचे साथीदार त्याच्याजवळ येतात. कोणाला कल्पनाही नसेल असे काही होईल.

या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवरील @iamnarendranath यांच्या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की,'आकस्मिक मृत्यूची प्रवृत्ती फक्त भारतातच नाही तर मस्कतमध्ये बॅडमिंटन कोर्टवर खेळत असताना एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला'.

व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याआधीही सोशल मीडियावर लग्नात नाचताना, कधी खेळताना, तर कधी रस्त्यावरून जात असताना अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT