Badminton Academy Launch: भारतातील खेळाडू आता मैदान गाजवणार ! या शहरात जागतिक दर्जाचे बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र लॉंच

Badminton Academy In Hyderabad: जागतिक दर्जाचे बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र ‘कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी’च्‍या लॉन्‍चची घोषणा केली
badminton academy
badminton academycanva
Published On

Kotak Pullela Gopichand Badminton Academy: २२ एप्रिल २०२३: कोटक महिंद्रा बँक लि. (‘केएमबीएल’ / ‘बँक’) आणि तिची सीएसआर सहयोगी पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशनने आज गचीबोवली, तेलंगणा येथे जागतिक दर्जाचे बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र ‘कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी’च्‍या लॉन्‍चची घोषणा केली. या लॉन्‍चप्रसंगी पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशनचे संस्‍थापकीय विश्‍वस्‍त व भारताचे राष्‍ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, विश्‍वस्‍त एल. व्‍ही. सुब्रमण्‍यम, महिंद्रा बँकेच्‍या पूर्ण-वेळ संचालक शांती एकमबरम आणि ग्रुपचे अध्‍यक्ष व ग्रुपचे चीफ फायनान्शियल ऑफिसर जयमिन भट उपस्थित होते.

badminton academy
Virat Kohli Record: कोहलीचा ‘विराट’ कारनामा! आजपर्यंत IPL स्पर्धेत कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम केला नावावर

नवीन लॉन्‍च करण्‍यात आलेले अत्याधुनिक बॅडमिंटन केंद्र केएमबीएलच्या क्रीडाविषयक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रकल्पाचा भाग आहे आणि बँक व बॅडमिंटनच्या क्षेत्रात भारताला अधिक नावलौकिक मिळवून देणाऱ्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाउंडेशनचे संस्‍थापकीय विश्‍वस्‍त भारतीय बॅडमिंटन दिग्‍गज पुलेला गोपीचंद यांच्या सामायिक दृष्टिकोनातून विकसित करण्‍यात आले आहे. बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र प्रगत पायाभूत सुविधा पुरवते, तसेच महत्त्वाकांक्षी व प्रशंसित खेळाडूंना आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देते.

२०१९ मध्‍ये कोटक महिंद्रा बँकेने भारतीय बॅडमिंटन खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची प्रशिक्षण सुविधा विकसित करण्‍यासाठी पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशन (फाऊंडेशन) सोबत सहयोगाने क्रीडामधील त्‍यांच्‍या सीएसआर प्रकल्‍पाची घोषणा केली. या नवीन प्रशिक्षण सुविधेचे लॉन्‍च दोन्‍ही संस्‍थांसाठी लक्षणीय टप्‍पा आहे, ज्‍यामधून देशामध्‍ये अपवादात्‍मक अॅथलीट्स व प्रशिक्षक विकसित करण्‍याचा त्‍यांचा समान दृष्‍टीकोन संपादित करण्‍याप्रती त्‍यांचा प्रवास सुरू होतो.

badminton academy
MS Dhoni On Retirement: MS Dhoni लवकरच IPL ला करणार गुड बाय! थरारक विजयानंतर दिले निवृत्तीचे संकेत

कोटक महिंद्रा बँकेच्‍या पूर्ण-वेळ संचालक शांती एकमबरम म्‍हणाल्‍या, ‘‘कोटक महिंद्रा बँक आणि पुलेला गोपीचंद यांचा भारतातील जागतिक दर्जाच्‍या बॅडमिंटन खेळाडूंना निपुण करण्‍याचा आणि देशाच्‍या भावी तरूणांसाठी क्रीडा पायाभूत सुविधा व मार्ग प्रबळ करण्‍याचा समान दृष्टिकोन आहे. आमचे सीएसआर प्रयत्‍न आर्थिक पार्श्‍वभूमी न पाहता सर्वांना दर्जेदार शिक्षण, उदरनिर्वाह, अनुकूल वातावरण व क्रीडा उपलब्‍ध करून देण्‍यावचर लक्ष केंद्रित करतात. आम्‍हाला पुलेला गोपीचंद आणि देशातील अॅथलीट्सना व क्रीडाप्रती वाढत्‍या आवडीला पाठिंबा देण्‍याप्रती समर्पित असलेल्‍या त्‍यांच्‍या फाऊंडेशनसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो.’’

badminton academy
IPL 2023 : IPL सुरू असतानाच विराट, रोहित अन् धोनीला मोठा धक्का, असं घडलं तरी काय?

भारतीय राष्‍ट्रीय प्रशिक्षक आणि पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशनचे संस्‍थापकीय विश्‍वस्‍त पुलेला गोपीचंद म्‍हणाले, ‘‘सध्‍याच्‍या बॅडमिंटन प्रशिक्षण सुविधेचा जागतिक चॅम्पियन्‍स निर्माण करण्‍याचा वारसा आहे, ज्‍यांनी ऑलिम्पिक्‍सपासून कॉमनवेल्‍थ गेम्‍सपर्यंत प्रमुख चॅम्पियनशिप्‍समध्‍ये भारताचे नावलौकिक केले आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू झाल्‍यापासून अकॅडमी देशाच्‍या कानाकोपऱ्यामधील क्षमतापूर्ण खेळाडूंसाठी महत्त्वाकांक्षी सुविधा बनली आहे. तसेच भारतात क्रीडाच्‍या वाढत्‍या विकासाला पाठिंबा देण्‍यासाठी नवीन कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी प्रगत पायाभूत सुविधा व कोच डेव्‍हलपमेंट देईल, ज्‍यामुळे खेळाडूंना आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन प्रशिक्षण मिळेल. आम्‍ही क्रीडामधील सर्वोत्तमता संपादित करण्‍याप्रती या प्रवासामध्‍ये कोटक महिंद्रा बँकेच्‍या सीएसआर फंडिंग सपोर्टसाठी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो.’’ (Latest sports updates)

badminton Academy
badminton Academy saam tv

हैदराबादमधील कोटक-पुलेला गोपीचदं बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रामध्‍ये प्रदान करण्‍यात आलेल्‍या सुविधा:

•उच्‍च-कार्यक्षम प्रशिक्षण केंद्रामध्‍ये सहा वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट आहेत.

•खेळाडूंच्‍या सर्वांगीण विकासासाठी नियुक्‍त करण्‍यात आलेले अव्‍वल दर्जाचे निवासी न्‍यूट्रिशनिस्‍ट्स, फिजियोथेरपीस्‍ट्स व स्‍ट्रेन्‍थ अॅण्‍ड कंडिशनिंग एक्‍स्‍पर्ट्स असलेले स्‍पोर्ट्स सायन्‍स सेंटर.

•जागतिक दर्जांनुसार उच्‍च दर्जाच्‍या प्रशिक्षण व कोचिंग सुविधा.

•अकॅडमीच्‍या आत व बाहेर मोठी कामगिरी करण्‍याची क्षमता असलेले आर्थिकदृष्‍ट्या वंचित प्रशिक्षक व खेळाडूंसाठी फेलोशिप प्रोग्राम्‍स.

•भारतभर बॅडमिंटन प्रशिक्षणाची पोहोच वाढवण्यासाठी जुन्या खेळाडूंसाठी कोच सर्टिफिकेशन प्रोग्राम.

या सहयोगामधून दोन्‍ही संस्‍थांची भारतीय बॅडमिंटनची वाढ व विकासासाठी योगदान देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

कोटक कर्मा ही कोटक महिंद्रा ग्रुप ऑफ कंपनीजची कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) ओळख आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com