तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यायाम करताना किंवा जेवण करताना हार्ट अटॅक येऊन व्यक्तीचा जीव गेल्याची बातम्या आपण वाचल्या असतील. उत्तर प्रदेशात एक अशीच एक घटना घडलीय. किराणा वस्तू घरी घेऊन जाणाऱ्या एका २२ वर्षीय युवकाला यमाने वाटेतच गाठल्याची घटना घडलीय. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Latest News)
दुकानातून किराणा घेऊन जात असताना एका २२ वर्षीय युवकाला हार्ट अटॅक (Heart Attack) आला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलीय. चालता- चालता हा युवक रस्त्यावर पडला, त्यावेळी त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांना वाटलं की, त्याला कोणत्यातरी वाहनाने धडक दिली असावी. परंतु परंतु डॉक्टरांनी (Doctor) त्याची तपासणी केली तेव्हा त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात ही घटना घडलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत युवकाचे नाव सुमित मौर्य असे आहे. सुमित बाजारात खरेदी करणयासाठी गेला होता. त्यावेळी किराणा घेऊन येत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. ही घटना बाजारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान ही घटना लखीमपूर खेरी जिल्ह्यातील आहे. येथील हिरालाल धर्मशाळेजवळ असलेल्या ओव्हर ब्रिजच्या जवळील बाजारपेठेत ही दुखद घटना घडली. सुमित एका हातात बॅग घेऊन जात होता, त्यावेळी तो अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याचे डोके रस्त्यावर जोरात आदळले आणि रक्त वाहू लागले. त्याचवेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना वाटलं की, कारने त्याला धडक दिली असावी. कार सुमित जेव्हा खाली पडला तेव्हा त्याच्या शेजारून कार गेली होती.
दरम्यान स्थानिक लोकांनी त्याला मोतीपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा प्राथमिक तपासणीतच डॉक्टरांनी सांगितले की, सुमितला हृदयविकाराचा झटका आल्याने तो खाली पडला आहे. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलाय. सुमित काशीराम कॉलनीत राहत होता आणि एका दुकानात काम करत होता. घटनेच्या वेळी ते दुकानातून घरी जात असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असं लखीमपूर खेरी पोलीस स्टेशनचे (Police Station) पोलीस अधिकारी अंबर सिंह यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.