पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमध्ये ड्रायव्हरलाच हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाहीये. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (latest News)
पश्चिम बंगालमधील ही बस बालासोर जिल्ह्यातील निलगिरी भागातील पंचलिंगेश्वरला जात होती. या बसमधून ६५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवत योग्य वेळी बसचा ब्रेक दाबला. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधून प्रवास करणारे प्रवासी कोलकत्ता येथील होते. बस चालवताना अचानक चालक एस के आख्तर यांना हृदयविकाराचा झटका आला. चालकाच्या छातीत तीव्र वेदना सुरु झाल्या. त्यावेळी ड्रायव्हरने बस रस्त्याच्या बाजूला थांबवली. यानंतर काही वेळातच ड्रायव्हर बेशुद्ध झाला. प्रवाशांनी ड्रायव्हरला जवळच्या रुग्णालयात नेले.मात्र, डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले.
मागील आठवड्यातही हरियाणा येथे एका बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी बसचे नियंत्रण सुटले होते. परंतु कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत स्टेअरिंग हातात घेऊन बस रस्त्याच्या बाजूला उभी केला. यावेळी चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.