Chhattisgarh News  Saam Tv
व्हायरल न्यूज

Chhattisgarh News: बाप होण्यासाठी 'अघोरी' कृत्य; जिवंत गिळलं कोंबडीचं पिल्लू, अन्..

Man Swallows Live Chick: छत्तीसगडमधील 35 वर्षीय पुरुषाच्या पोटात कोंबडीचं जिवंत पिल्लू सापडल्याने डॉक्टरांना धक्का बसला. कोंबडीचं पिल्लू या व्यक्तीच्या पोटात कसं आलं? त्या व्यक्तीचं काय झालं हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

छत्तीसगडमध्ये असलेल्या अंबिकापूर येथील ३३ वर्षीय व्यक्तीचा श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. परंतु जेव्हा या व्यक्तीच्या मृत्यूचं खरं कारण सर्वांना समजलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर काहींना मोठा धक्का बसला.आई-वडील होण्याचं स्वप्न जोडप्यांचं असतं. आई- बाबा होणं हे मोठ्या सुखाची अनुभवती देणारं असतं.

आई-बाबा होण्याचं सुख मिळावं यासाठी एका व्यक्तीने अघोरीपणा केला आणि जीव गमावला. हा प्रकार छत्तीसगडमध्ये घडलाय. आनंद यादव नावाच्या व्यक्तीने जिंवत कोंबडीचं पिल्लू गिळलं होतं. यामुळे त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्याचा मृत्यू झाला, असं येथील डॉक्टरांनी सांगितलं. आता जिंवत कोंबडीचं पिल्लू का आणि कशासाठी गिळलं, याचं कारणही जाणून घेऊया.

कोंबडीचं पिल्लू गिळण्याचं कारणही अनेकांना धक्का देणारं आहे. पिल्लू गिळण्याचं कारण होतं बाप होण्याचं स्वप्न. मुलं व्हावं यासाठी या व्यक्तीने कोंबडीचं पिल्लू गिळलं होतं. परंतु त्यात त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्तीला बाप व्हायचे होते. त्यामुळे त्याने अघोरी कृत्य केलं. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं.

त्यानंतर त्याला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचं पोस्ट मॉर्टम करण्यात आलं. तेव्हा त्याच्या शरीरात पिल्लू आढळून आले. कोंबडीचं पिल्लू पाहून डॉक्टर मोठा धक्का बसला.

काय म्हणाले कुटुंबातील लोक?

आनंद यादव हा अंबिकापूरमधील छिंदकलो गावातील रहिवाशी होता. घरी अंघोळ करून बाहेर आल्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली होती. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर तो खाली पडला. मग त्याला स्थानिक शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने रुग्णालयात आणलं. पण त्याचा मृत्यू झाला त्यानंतर डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टम केलं.

काय म्हणाले डॉक्टर?

सुरुवातीला मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र त्याच्या गळ्याजवळ चीर केल्यानंतर डॉक्टरांना तेथे कोंबडीचं पिल्लू आढळून आले. हा प्रकार पाहून डॉक्टरांना मोठा धक्का बसला. हे कोंबडीचं पिल्लू आनंद यादव यांच्या अन्ननलिकेत श्वसननलिकेच्या कार्याला अडथळा आणत होतं. अशा प्रकारे आत अडकलं होतं. त्यामुळे आनंद यादव यांना श्वासोच्छवास त्रास होत होता.

माझ्या कारकिर्दीत मी पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना पाहिलीय. 15,000 हून अधिक पोस्टमॉर्टम केले आहेत. या निष्कर्षांनी आम्हा सर्वांना धक्का बसला आहे," असंही बाग म्हणालेत. दरम्यान स्थानिकांच्या मते, हे कृत्य मांत्रिकाच्या सांगण्यावरून केलं असावं. आनंद अंधश्रद्धेच्या आहारी गेला असावा. काही रहिवाशांच्या मते, आनंद वंध्यत्वाशी झुंज देत होता. त्याला बाप होण्याचं सुख मिळवायचं होतं. असं केल्याने त्याची समस्या सुटेल असं त्याला वाटत असावं त्यामुले त्याने कोंबडीचं पिल्लू गिळलं असावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT