Chennai Baby Rescue Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Chennai Baby Rescue Video: बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीच मोठ्या शिताफीने या बाळाचे प्राण वाचवले आहेत. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाळाला वाचवण्यात यश आले. हे रेस्क्यू ऑपरेशन पाहताना बघणाऱ्यांचेही श्वास अडकले होते.

Priya More

चेन्नईमधील (Chennai) एका बाळाच्या रेस्क्यूचा (Baby Rescue Video) धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लास्टिकच्या छतावर हे बाळ अडकले होते. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीच मोठ्या शिताफीने या बाळाचे प्राण वाचवले आहेत. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाळाला वाचवण्यात यश आले. हे रेस्क्यू ऑपरेशन पाहताना बघणाऱ्यांचेही श्वास अडकले होते. या घटनेचा रेस्क्यू व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील एका अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. लहान बाळ बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीवरील प्लास्टिकच्या छतावर अडकले होते. एकीकडे बाळ खूप रडत होते तर दुसरीकडे या बाळाला वाचवण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरु होते. या घटनेमुळे या ब्लिडिंगमध्ये गोंधळाचे वातावरण होते. बाळाला झेलण्यासाठी काही नागरिकांनी बिल्डिंगच्या खाली बेडशीट घेऊन उभे राहिले. जेणे करून बाळ खाली पडले तर त्याला झेलता येईल.

तर काही जण बाळ ज्याठिकाणी अडकले आहे त्याच्या खालच्या मजल्यावरून खिडकीतून त्याला खाली काढण्याचा प्रयत्न करत होते. हे बाळ प्लास्टिकच्या छतावरून खाली खाली सरकत होते. त्यामुळे पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. एक-एक जण खिडकीतून बाहेर येऊन दुसऱ्याची मदत घेऊन बाळाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण अनेकांचा हात पोहचत नव्हता. अशामध्ये एका व्यक्तीने अतिशय शिताफिने बाळाला या छतावरून खाली काढले.

ही संपूर्ण घटना समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. या व्हिडीओमध्ये या महिलांचा आवाज येत आहे. त्या देखील बाळ वाचावे यासाठी बोलताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी बाळाला वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT