Virat Kohli Reaction Saam Tv
व्हायरल न्यूज

Virat Kohli Reaction: पांड्याचे षटकार अन् भारताच्या विजयावर विराट-गंभीरचा तुफान जल्लोष; VIDEO व्हायरल

Ind vs Aus Semi Final Moment: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.

Tanvi Pol

Kohli Gambhir celebrate Pandya’s shots: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने काल अविस्मरणीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर संपूर्ण भारतीय संघाचा जल्लोश पाहण्यासाठीही मिळाला.मात्र, क्रिकेट प्रेमींना विशेष लक्षात राहिला तो विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा आनंदोत्सव.गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर त्या क्षणाता व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओ विराट कोहली आणि गौतम गंभीर एकत्र येत आनंदाने ओरडताना आणि टाळ्या वाजवत जल्लोष साजरा करत आहे असे दिसत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत(India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला होता. या लढतीत भारताने दमदार विजय मिळवला आहे. या दिमाखदार कामगिरीमुळे टीम इंडिया थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे.काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने चांगला खेळ केला.

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष!

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीतून शूट करण्यात आल्याचे दिसत आहे.यात विराट कोहली आणी गौतम गंभीर एकत्र येऊन आनंद साजरा करत आहेत.सामना संपल्यानंतर काही क्षणात दोघांनीही टीम इंडियाच्या दमदार विजयाचा जल्लोष साजरा केलाय.प्रत्येक क्रिकेट प्रेमींसाठी हा क्षण अधिक खास होता तो म्हणजे,कोहली आणि गंभीर यांच्यातील वाद अनेकदा चर्चेत राहिला.परंतू,या विजयाच्या क्षणी दोघेही एकत्र आल्याने अनेक चाहत्यांमध्ये आनंद दिसून आला.

विराट कोहलीचा व्हिडिओ(Video) सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@iitaukir' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.सध्या व्हिडिओला करोंडोच्या घरात लाईक्स मिळाले असून व्ह्यूजही लाखोंच्या घरात मिळत आहेत.ऐवढेच नाही तर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील प्रत्येकाने भारतीय संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर काहींनी विजयाचे कौतुकही केलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT