IPL Stadium Viral Video: भावाला कडक सलाम! खर्च करुन स्टेडियममध्ये गेला अन् मोबाईलवर Match बघत बसला; VIDEO व्हायरल

Man Watching IPL Match On Mobile In Stadium: मोबाईलवर बघायची होती तर जायचचं कशाला, असे म्हणत नेटकऱ्यांनी व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...
Viral Video
Viral VideoSaamtv

Viral Cricket Fan Video: सध्या क्रिडा विश्वात आयपीएलचा रणसंग्राम सुरू आहे. आयपीएल म्हणलं की तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला पाहायला मिळतो. क्रिकेट पाहण्याचा छंद प्रत्येकाला असतो. आयुष्यात एकदा तरी स्टेडियममध्ये जावून मॅच पाहायची इच्छा असते.

पण, सध्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने स्टेडियममध्ये जावूनही असा काही प्रताप केला, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावालं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू.

Viral Video
Asia Cup 2023: आशिया कप रद्द होणार! टीम इंडियानंतर आणखी २ संघांनी स्पर्धेतून घेतली माघार?

सध्या आयपीएल (IPL 2023) सामन्यांचा थरार क्रिडा विश्वात पाहायला मिळत आहे. ज्यामधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्टेडियमधील प्रेक्षकांच्या मस्तीचे, आनंदाचे क्षण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका क्रिकेटप्रेमी तरुणाच्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जो पाहिल्यानंतर हसू आवरणे, कठीण झाले आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मैदानात सामना सुरू आहे. प्रेक्षक खेळाचा आनंदही घेत आहेत. मात्र एक तरुण स्टेडिमध्ये तीच मॅच चक्क मोबाईलवर पाहताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ एकाने शूट करत सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

स्टेडियममध्ये (Stadium) मॅच पाहायला आला असताना हा तरुण मोबाईमध्ये मॅच पाहत असल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर, तो स्टेडियममध्ये आलाच कशाला? अशा कमेंट नेटकरी करत आहेत. तर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लखनऊ स्टेडियममधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हायरल व्हिडिओला (Viral Video) “एवढ्या लांबून सामना दिसत नाही तर काय करु” असा कॅप्शन दिला आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी मॅच झोपून पाहायची होती वाटतं, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही जणांनी हा व्हिडिओ मॅच सुरू होण्याच्या आधीचा असल्याचेही सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com