Bride on bike: शहरात लग्नसराई सुरू झाली की, ट्रॅफिक हा एक मोठा अडथळा ठरतो. मात्र, बऱ्याच वेळा हीच अडचण हटके आणि संस्मरणीय क्षण घडवते. असाच एक प्रसंग घडला एका शहरात जिथे एका नवरीने ट्रॅफिकमध्ये अडकून वेळ न घालवता थेट बाईकवर बसून लग्नाच्या हॉलकडे प्रस्थान केलं. या हटके नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही घटना नेमकी कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजले नाही. मात्र घडलं असं की, नवरी बाईचा मेकअप, पारंपिक लग्नाचा पोशाख आणि सर्व तयारीही झाली होती. संध्याकाळच्या लग्नाचा मुहुर्तही जवळ आला होता, पण लग्नाच्या हॉलच्या(Weeding Hall) मार्गावर त्याच वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नवरी आणि सर्व मंडळी ठरलेल्या वेळेच्या आधी लग्नस्थळी पोहोचू शकत नव्हती.
नवरीच्या घरचे काही वेळासाठी फार चिंतेत पडले. वऱ्हाडी मंडळी, फोटोग्राफर, बँडवाले – सगळे वेळेत हॉलवर पोहोचले होते, मात्र, नवरी मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली होती. वेळ पुढे जात होता, आणि मुहूर्ताची वेळ जवळ येत होती. त्यानंतर नवरी आणि तिच्या सोबत असलेल्या काहींनी एक जबरदस्त कल्पना सुचवली की, बाईकवरुन हॉलवर पोहचावे लागेल. सर्व ऐकून वरीही तयार झाली आणि बाईकवर बसून हॉलच्या दिशेने निघाली.
नवरी(Wedding Bride) मुलगी बाईकवरुन जात असताना रस्त्यावरील एका व्यक्तीने सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि mahesh_buchude_pati या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवर अपलोड केला. अवघ्या दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून हजारो नेटकऱ्यांनी याला लाईक्स दिलेले आहे तर अन्य माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.