Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

INSTAGRAM DATA LEAK ALERT: इन्स्टाग्रामचा वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इन्स्टाग्राम युजर्सने वेळीच सावधान होणं गरजेचे आहे. कारण १.७६ कोटी युजर्सचा पर्सनल डेटा लीक झाला आहे.
Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...
INSTAGRAM DATA LEAK ALERTGoogle
Published On

Summary -

  • १.७६ कोटी इन्स्टाग्राम अकाउंट्सचा डेटा लीक

  • पासवर्ड रिसेट स्कॅमद्वारे अकाउंट हायजॅक करण्याचा प्रयत्न

  • युजर्सनी फेक ईमेलपासून सावध राहण्याचा सल्ला

इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. जवळपास १७.५ मिलियन म्हणजेच १.७६ कोटी इन्स्टाग्राम युजर्सचा पर्सनल डेटा लीक झाला आहे. हा दावा अँटीवायरस सॉफ्टवेअर कंपनी मेलवेअरबपाइट्सने (Malwarebytes) केला आहे. ही माहिती समोर येताच इन्स्टाग्राम युजर्स चिंतेत आले आहेत. त्यामुळे आता इन्स्टाग्रामचा वापर करताना युजर्सने सावधानगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.

१.७५ कोटी युजर्सचा डेटा लीक -

मेलवेअरबाइट्सने आरोप केला आहे की, डेटा उल्लंघनामुळे १.७५ कोटी इन्स्टाग्राम युजर्सचे संवेदनशील डेटा आणि महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. इन्स्टाग्राम युजर्सचे नाव, ईमेल अ‍ॅड्रेस, फोन नंबर आणि घराचा पत्ता लिक झाला आहे. अंदाजे १.७५ कोटी इन्स्टाग्राम युजर्सच्या संबंधित माहिती डार्क वेबवर विकली जात आहे. मेलवेअरबाइट्सच्या या आरोपानंतर चर्चांना उधाण आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, लीक झालेल्या डेटामध्ये युजर्सचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि काही प्रकरणांमध्ये युजर्सचा घरचा पत्ता देखील लीक होत आहे. हा डेटा वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. सायबर क्रिमिनल याचा गैरवापर करू शकतात.

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...
Instagram Reels: कामाची बातमी! आता हिंदीतून रिल्स बनवणाऱ्यांना मिळणार जास्त पैसे; मेटाने लाँच केले नवं फिचर्स

युजर्सने वेळीच व्हा सावध -

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, हे थेट अकाउंट हॅकिंगशी संबंधित आहे. जिथे युजर्सना त्यांच्या अकाउंटवर नियंत्रण मिळविण्यासाठी दिशाभूल केली जाते. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये पाठवलेले ईमेल पूर्णपणे खरे दिसतात आणि ते इन्स्टाग्रामच्या अधिकृत आयडीवरून आलेले दिसतात. ज्यामुळे युजर्सना या सापळ्यात अडकवणे सायबर क्रिमिनलला सोपे होते. पासवर्ड रिसेटचा मेसेज आल्यावर युजर्सने सावधान होणं गरजेचे आहे.

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...
Instagram New Feature: इन्स्टाचं भन्नाट फीचर! कोणत्या दिवशी कोणता रील पाहिला? यूजर्सला मिळणार A TO Z माहिती

पासवर्ड रिसेट अटॅक -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १.७५ कोटी इन्स्टाग्राम अकाउंट्सवरील डेटा ब्रीचफोरम्स नावाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यानंतर हॅकर्सनी पासवर्ड रिसेट अटॅक म्हणून ओळखली जाणारी एक नवीन पद्धत अवलंबली आहे. या पद्धतीमध्ये हॅकर्स थेट तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर त्याऐवजी इन्स्टाग्रामद्वारे पासवर्ड रिसेट रिक्वेस्ट पाठवतात. जेव्हा युजर्सना हा ईमेल मिळतो तेव्हा ते त्याला खरा इन्स्टाग्राम सिक्युरिटी अलर्ट समजतात आणि पासवर्ड रिसेट लिंकवर क्लिक करतात. त्यांनी केलेली ही चूक त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट धोक्यात आणू शकते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्स तुमच्या अकाऊंटवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात.

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...
Instagram युजर्ससाठी खूशखबर! आवडलेल्या अन् टॅग नसलेल्या स्टोरीज होतील पुन्हा शेअर, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

पासवर्ड रिसेटच्या ईमेलकडे करा दुर्लक्ष -

जर तुम्हाला पासवर्ड रिसेटचा इमेल आला असेल तर सावध राहा. जर तुम्ही स्वतः पासवर्ड बदलण्याची रिक्वेस्ट पाठवली नसेल तर या ईमेलकडे दुर्लक्ष करणे चांगले राहिल. तुमचे अकाऊंट अधिक सुरक्षित करण्यासाठी तुम्ही टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन हे फीचर देखील चालू करू शकता. हे फीचर चालू केल्यामुळे जरी हॅकरने तुमचा पासवर्ड मिळवला तरीही तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करण्यापूर्वी त्यांना अतिरिक्त सुरक्षा तपासणी पूर्ण करावी लागेल.

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...
Instagram: रील्स बघताना आता वारंवार स्क्रोल करायची गरजच नाही; इन्स्टाग्रामचं ऑटो स्क्रोल फीचर आलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com