

इन्स्टाग्रामचं नवीन फीचर लाँच
आता रील्स ऑटो स्क्रोल फीचरमुळे होणार फायदा
आपोआप रील्स होणार स्क्रोल
प्रत्येकाच्या फोनमध्ये इन्स्टाग्राम आहे. इन्स्टाग्रामने एक नवीन फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरमुळे रील्स स्क्रोल करणे खूप सोपे होणार आहे. यामुळे तरुणांना सोशल मीडियाचे अधिक वेड लागू शकते. दरम्यान, आता रील्स ऑटो स्क्रोल होणार आहे. सध्या तुम्हाला हाताने रील्स स्क्रोल करावे लागते. परंतु आता रील्स आपोआप स्क्रोल होणार आहे. यामुळे रिल्स बघणाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.
इन्स्टाग्रामचं नवीन फीचर (Instagram New Feature)
इन्स्टाग्रामच्या अल्गोरिथममुळे प्रत्येक इन्स्टाग्राम युजर्संना त्यांच्या आवडीनुसार रिल्स दिसतात.दरम्यान, आता तुमच्या आवडीच्या रील्स कोणत्याही स्क्रोलिंगशिवाय पाहता येणार आहे. परंतु यामुळे मात्र गैरफायदादेखील होऊ शकतो. तरुणांना सारखे रिल्स बघण्याचे वेड लागेल. आता एका पाठोपाठ रिल्स येतील.
ऑटो स्क्रोल फीचर कसं ऑन करायचं? (Instagram Reels Auto Scroll Feature)
इन्स्टाग्राम गेल्या अनेक दिवसांपासून ऑटो स्क्रोल फीचरची चाचणी करत आहे. हा ऑटो स्क्रोलचा पर्याय तुम्हाला रिल्स सेक्शनच्या खाली उजव्या बाजूला दिसणार आहे. हॅम्बर्गर आयकॉनवर टॅप केल्यावर अनेक पर्याय ओपन होतात.त्यात तुम्हाला ऑटो स्क्रोल फीचर दिसेल. हे फीचर तुम्हाला ऑन करायचे आहे. यामुळे जेव्हा तुम्ही रिल्स पाहतात तेव्हा ते आपोआप स्वाइप होईल आणि सारख्या रील्स तुम्हाला दिसतील.
सध्या सर्वात जास्त तरुणाई इन्स्टाग्रामचा वापर करतात. इन्स्टाग्रामवर अनेकजण रिल्स करतात आणि बघतात. रील्स करणाऱ्यांना त्यांचे व्ह्यूज वाढवायचे असतात. आता या फीचरमुळे रील्सस्टारचे व्ह्यूज वाढण्यासही मदत होणार आहे. अनेक युजर्सच्या इन्स्टाग्राम फीडमध्ये तुमचे रील्स जातील. त्यामुळे तुमचे लाईक्स आणि व्ह्यूजदेखील वाढतील. यामुळे युजर्स आणि रील्सस्टार्संनाही फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.