15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा ही ट्रिक

15 Lakh Salary Tax Free: पुढच्या महिन्यात केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. यामध्ये कर भरणाऱ्याना दिलासा मिळणार आहे. मात्र आता तुमचा पगार 15 लाखापर्यंत असल्यावर कर माफ होऊ शकतो.
Smart tax planning using EPF and NPS can legally reduce income tax on salaries up to ₹15 lakh.
Smart tax planning using EPF and NPS can legally reduce income tax on salaries up to ₹15 lakh.Saam Tv
Published On

नवीन वर्ष सुरू झाले आहे. काही दिवसांनी आयकर विभाग आईटीआर फॉर्म भरणे सुरू करेल. जर तुमचा पगार 12 लाख रुपये पर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. पण जर तुमची इनकम यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयकर विभाग काही प्रमाणात सूट देईल. याला स्टँडर्ड दिडक्शन म्हणतात. जी 75000 पर्यंत असते. ही सूट आयकर विभाग अॅक्ट, 1961 कलम 115BAC (1A) (iii) च्या अंतर्गत मिळते.

Smart tax planning using EPF and NPS can legally reduce income tax on salaries up to ₹15 lakh.
X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

पण जर तुमचे उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. त्यासाठी आणखी एक पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही टॅक्स फ्री ठेऊ शकता. हे पण एक नवीन कर प्रणाली आहे. इकॉनॉमिक टॅक्सने दिलेल्या माहितीनुसार, जर तुमची कंपनी तुम्हाला एम्पलॉय प्रोविडेंट फंड आणि नॅशनल पेन्शन सिस्टिम मध्ये योगदान करण्याची मुभा देतात. तर तुम्ही 14.66 लाख रुपये पर्यंत पगार देखील टॅक्स फ्री करू शकता.

Smart tax planning using EPF and NPS can legally reduce income tax on salaries up to ₹15 lakh.
PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

कसे कराल टॅक्स फ्री?

जवळपास 15 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यासाठी, तुमची कंपनी EPFO आणि NPS दोन्हीची सदस्य असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला त्यामध्ये पैसे जमा करण्याची परवानगी द्यावी लागते. जर तुमची कंपनी EPF अंतर्गत कर सूट देत असेल पण MPS अंतर्गत नसेल, तरी देखील तुम्ही नवीन कर प्रणाली अंतर्गत तुमचा 13.56 लाख पगार करमुक्त करू शकता.

Smart tax planning using EPF and NPS can legally reduce income tax on salaries up to ₹15 lakh.
EPFO News : नोकरी सोडली किंवा गेली तर पीएफ खात्यात व्याज जमा होतो का? ईपीएफओने स्पष्टच सांगितले

सवलत कशी मिळवायची?

मखीजानी गेरा अँड असोसिएट्स एलएलपीचे मॅनेजिंग पार्टनर गौरव मखीजानी सांगतात की नवीन करप्रणाली निवडणाऱ्या करदात्यांना कर्मचारी म्हणून EPF मध्ये जमा केलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कोणतीही सूट मिळत नाही. ही बाब जुन्या करप्रणालीपेक्षा वेगळी आहे, कारण जुन्या करप्रणालीत EPF मध्ये जमा झालेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत सूट मिळायची.

मखीजानी पुढे म्हणतात, “येथे नियोक्ता (कंपनी) कडून दिले जाणारे योगदान बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता (DA) यांच्या 12 टक्क्यांपर्यंत जुन्या आणि नवीन दोन्ही करप्रणालींमध्ये करमुक्त राहते. मात्र, ही करमुक्त मर्यादा एकूण 7.5 लाख रुपयांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे, जी जुनी आणि नवीन दोन्ही करप्रणालींना लागू होते.

Smart tax planning using EPF and NPS can legally reduce income tax on salaries up to ₹15 lakh.
Vande Bharat Sleeper: 'या' दिवशी धावणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

मखीजानी पुढे सांगतात की NPS (नॅशनल पेन्शन सिस्टिम) च्या बाबतीत, नवीन करप्रणालीत कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या योगदानावर कोणतीही करसवलत मिळत नाही. मात्र, नियोक्त्याचे (Employer) योगदान, जे बेसिक पगार आणि महागाई भत्ता (DA) यांच्या 14% पर्यंत असू शकते, ते जुनी आणि नवी दोन्ही करप्रणालीत करमुक्त असते.

15 लाखांपर्यंतचा पगार कसा करमुक्त करता येऊ शकतो?

समजा तुमचा एकूण पगार 14.66 लाख रुपये आहे.

तुमचा बेसिक पगार : 7.33 लाख रुपये (14.66 लाखांचा 50%)

नियोक्त्याचे EPF योगदान :

बेसिक पगाराच्या 12% म्हणजे सुमारे 87,960 रुपये — हे करमुक्त आहे

नियोक्त्याचे NPS योगदान :

बेसिक पगाराच्या 14% म्हणजे सुमारे 1,02,620 रुपये — हेही करमुक्त आहे

याशिवाय, नवीन करप्रणालीत 75,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन मिळते

आता हिशेब पाहूया

एकूण पगार : 14,66,000 रुपये

नियोक्त्याचे EPF योगदान (करमुक्त) : 87,960 रुपये

नियोक्त्याचे NPS योगदान (करमुक्त) : 1,02,620 रुपये

स्टँडर्ड डिडक्शन : 75,000 रुपये

एकूण करबचत : 2,65,580 रुपये

यामुळे करपात्र उत्पन्न लक्षणीयरीत्या कमी होते. या सर्व सवलती लक्षात घेतल्यास, ज्या रकमेवर प्रत्यक्ष कर लागतो ती बरीच घटते आणि त्यामुळे 14.66 लाख रुपयांचा पगार प्रभावीपणे करमुक्त ठरू शकतो.

निवृत्तीसाठी मोठा फंड

EPF आणि NPS हे केवळ करबचतीसाठीच नाहीत, तर दीर्घकालीन दृष्टीने निवृत्तीसाठी मोठा निधी उभारण्यासही मदत करतात.

जर 25 वर्षांचा एखादा व्यक्ती दरमहा 10,000 रुपये NPS मध्ये गुंतवू लागला, आणि ही रक्कम दरवर्षी 5% ने वाढवत राहिला,

तसेच 60 वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवली आणि त्याला वार्षिक 12% परतावा मिळाला,

तर तो सुमारे 8.62 कोटी रुपयांचा मोठा फंड उभारू शकतो.

त्याचप्रमाणे, 25 वर्षांचा व्यक्ती EPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवू लागला,

दरवर्षी गुंतवणूक 5% ने वाढवत राहिला, आणि त्यावर 8.25% व्याज मिळाले,

तर तो सुमारे 4.05 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com