धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

Dhananjay Munde Bjp Entry Speculation Maharashtra Politics: अजित पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले धनंजय मुंडे भाजपात जाण्याची चर्चा रंगलीय... मात्र ही चर्चा रंगण्यामागे नेमकं काय कारण आहे... आणि खरंच धनंजय मुंडे भाजपात जाऊ शकतात का?
Dhananjay Munde with Maharashtra CM Devendra Fadnavis, triggering speculation about a possible BJP switch
Dhananjay Munde with Maharashtra CM Devendra Fadnavis, triggering speculation about a possible BJP switchSaam Tv
Published On

हा व्हीडीओ नीट पाहा....सातत्यानं अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळी दांडी मारलेल्या धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला हजेरी लावलीय आणि धनंजय मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.... हे कमी होतं की काय... देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख माझा मित्र असा केला.. आणि मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखीच जोर चढला....

खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली... त्यामुळे धनंजय मुंडे जवळपास 10 महिने झाले मंत्रिपदापासून दूर आहेत.. आता देशमुख हत्या प्रकरण थंड झाल्याचं चित्र आहे... त्यातच आता माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद रिक्त आहे...आणि या रिक्त पदावर मुंडेंचा डोळा असल्याची चर्चा आहे.. तर अजित पवार मुंडेंना मंत्रिपद देण्यास अनुकूल नसल्यानं धनंजय मुंडे राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय.. त्यामुळे मुंडेंनी कौटुंबिक कारण देत बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या बीड दौऱ्याला वारंवार दांडी मारलीय...

नगरपालिका निवडणूक प्रचारावेळी 24 डिसेंबरला बीडमधील सभेला दांडी

29 नोव्हेंबरला माजलगाव, बीड, धारुरच्या सभेला दांडी

1 जानेवारीला नगरसेवकांच्या सत्कार समारंभाला दांडी

याआधीही अजित पवारांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या छगन भुजबळांच्या उपस्थितीतील मेळाव्याला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती.. त्यामुळे अजित पवार मुंडेंवर नाराज असल्याची चर्चा आहे.. याच अस्वस्थतेतून मुंडे अजित पवारांच्या बैठकांना दांडी मारत फडणवीसांशी पुन्हा जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातील अंतर वाढत गेल्यास धनंजय मुंडे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे... त्यामुळे भाजप पुन्हा आपला माळी, धनगर, वंजारी हा माधव पॅटर्न सोबत ठेवण्यासाठी मुंडेंना गळाला लावणार का? आणि मुंडे अजित पवारांची साथ सोडून कमळ हाती घेणार का?याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com