Tea Cancer: वेळीच व्हा सावध! चहामुळे होऊ शकतो कॅन्सर?  Saam Tv
व्हायरल न्यूज

Tea Cancer: वेळीच व्हा सावध! चहामुळे होऊ शकतो कॅन्सर?

Tea Cancer Viral Video: चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. कारण चहा पिण्याऱ्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. अनेकांचा दिवस चहा मिळेपर्यंत सुरूच होत नाही. मात्र हाच चहा तुमच्या जीवावर बेतू शकतो. चहामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

Mayuresh Kadav

चहाची तल्लफ लागली की चहा लागतो. आपल्या दिवसाची सुरूवात होते तीच मुळी गरमा गरम चहानं...सकाळी चहा घेतला नाही तर अनेकांची झोपच उडत नाही. चहा नसेल तर डोकं दुखं लागतं. चहाची नशाच चाहत से मजबूर असं म्हणायला भाग पाडते. तुमच्या आयुष्यात गोडवा आणणारा हाच चहा तुमच्या जिवावरही उठू शकतो. चहामुळे कॅन्सर होऊ शकतो असा दावा सोशल मीडियात केला जातोय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय.

व्हायरल मेसेज

चहामध्ये वापरले जाणारे रंग आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. या कलरमध्ये कीटकनाशक मिसळलेलं असतं. त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. FSSAI नं कर्नाटकातून जवळपास 71 सँपल जप्त केले आहेत. ज्यात कॅन्सर पसरवणारे घटक असल्याचं समोर आलंय.

या मेसेजमुळे चहाप्रेमींची झोपच उडालीय. अनेकजण तल्लफ आली की दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात. चहामुळे खरच कॅन्सर होऊ शकतो का? या चिंतेनं त्यांना ग्रासलंय. त्यामुळे आम्ही या मेसेजमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. FSSAIच्या वेबसाईटची पडताळणी केली तेव्हा तिथं भेसळयुक्त चहा पावडर कशी ओळखावी याच प्रात्यक्षिक दिसून आलं.

कशी ओळखाल चहातली भेसळ?

सर्वात आधी फिल्टर पेपर घ्या, त्यावर चहापावडर पसरवा..फिल्टर पेपर ओला करण्यासाठी पाणी घाला. थोड्यावेळानं कागद नळाच्या पाण्याखाली धुवा. आता फिल्टर पेपरवरील डाग उजेडात पाहा. भेसळ नसल्यास कागदावर कोणताही डाग पडणार नाही, भेसळयुक्त चहापावडरमध्ये कागदावर गडद डाग दिसतो. FSSAIच्या साईटवरील माहिती आणि तज्ज्ञांच्या प्रतिक्रियेनंतर आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते जाणून घेऊ...

चहापावडर बनवण्याच्या प्रक्रियेवेळी रोडामाईन बी आणि कर्मोसेन फूड कलर मिसळलं जातं. रोडामाईन बीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला निमंत्रण मिळू शकतं. तर टी बोर्डाच्या माहितीनुसार रंग आणि चमक देण्यासाठी बिस्मार्क ब्राऊन, पोटॅशियम ब्लू, इंडिगोचा वापर केला जातो. हे केमिकल आरोग्यासाठी घातक आहे.

त्यामुळे आमच्या पडताळणीत केमिकलयुक्त विषारी चहा प्यायल्यानं कॅन्सर होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय. अर्थात सगळ्याच कंपन्या चहापावडर बनवण्यासाठी अशा केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करताच असं नाही. त्यामुळे चहापावडरच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT