Flight Emergency Landing : तुम्हाला खरं वाटणार नाही, पण फक्त डोक्यात उवा असल्यामुळे विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करावे लागलेय. होय, अमेरिकेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिला प्रवाशाच्या डोक्यात उवा असल्यामुळे लॉस एंजिल्स ते न्यूयॉर्क यादरम्यानचं विमानाचं एमर्जन्सी लँडिंग (Flight Emergency Landing) करण्यात आले. याप्रकरणामुळे इतर प्रवाशांना तब्बल १२ तास ताटकळत बसावं लागले. इथान ज्युडेलसनने (Ethan Judelson) यानं प्रकारणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असा याबाबतचा दावा केलाय.
ज्युडेल्सनने आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाले की, मी विमानतळावर 12 तास होतो कारण माझी फ्लाइट एमर्जन्सी लँड झाली होती. विमानात महिलेच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात उवा होत्या. दोन प्रवाशांनी या महिलेल्या केसांमध्ये उवा पाहिल्यानंतर एअर होस्टेसला (Air Hostess) यासंदर्भात कळवलं. त्यामुळे विमानातील इतर सहकाऱ्यांना त्रस होत होता. त्यामुळे ऍरिझोना येथे अचानक लँडिंग करण्यात आले.
महिलेच्या डोक्यात उवा झालेल्या विमानाचं एमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १२ तासांनी विमान न्यूयॉर्ककडे रवाना झालं. यासंदर्भात कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, इथान ज्युडेलसनने आपल्या व्हिडीओत म्हटले. १२ तासानंतर विमानाने उड्डाण घेतलं, त्यावेळी प्रवाशांना आपल्या आधीच्याच सीट्सवर बसण्यास सांघण्यात आले. पण उवा झालेल्या महिलेच्या शेजारील दोन्ही मुलीनं बसण्याच नाकार दिला. असेही त्याने म्हटलेय.
विमान कंपनीकडून स्पष्टीकरण -
लॉस एंजिल्सकडून न्यूयॉर्क जाणाऱ्या विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. १२ तास प्रवाशी ऍरिझोना येथील विमानतळावरच होते. पुन्हा विमानाने उड्डाण घतलं. यावर अमेरिकन विमान कंपनीने स्पष्टीकरण दिलं. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटल की, १५ जुलै रोजी अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 2201 लॉस एंजिल्सवरुन न्यूयॉर्कला जात असतानाला वळवण्यात आलं. एका प्रवाशाला वैद्यकीय गरज भासल्याने हा निर्णय घेतला गेला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.