Bihar wedding shooting saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! स्टेजजवळ जात तरुणाने नवरीला गोळी झाडली, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Bihar wedding shooting: बिहारच्या बक्सरमध्ये लग्न समारंभात एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने वधूवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या वधूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बिहारमधील बक्सरमध्ये झालेल्या लग्न समारंभात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. वरमाळा घातल्यानंतर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने वधूवर गोळी झाडल्याची घटना समोर आलीये. गोळी पोटात लागल्याने वधू गंभीर जखमी होऊन मंचावरच कोसळली. यावेळी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

ही घटना मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर चौसा पंचायतच्या मल्लाह टोला भागात घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलियामधून मंगळवारी रात्री बारात आली होती आणि लग्नाचे सर्व कार्यक्रम ठरवलेल्या पद्धतीने सुरू होते. वधू नातेवाईकांसह आणि मैत्रिणींसोबत स्टेजवर आली. वधू आणि वराला एक महिला ओवाळत असताना महिलांच्या गर्दीतून आरोपी अचानक पुढे आला आणि तिच्यावर गोळीबार केला. गोळीचा आवाज होताच लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जखमी अवस्थेत वधूला प्रथम रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर अधिक उपचारासाठी वाराणसीमध्ये पाठवण्यात आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जखमी असताना वधूने आरोपीचं नाव घेत, दीनबंधूने मला गोळी मारली, असं सांगितल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये.

आरोपी दीनबंधू हा वधूचा शेजारी असून प्रकरण एकतर्फी प्रेमाशी संबंधित आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, आरोपी मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मुलीकडून त्याच्याबद्दल काहीही नव्हतं. दरम्यान आरोपीच्या वडिलांनी या संबंधाबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. माहिती असती तर दोघांचं लग्न लावून दिलं असतं, असंही ते म्हणालेत.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या घराला कुलूप लावलं असून फरार आरोपीच्या शोधासाठी छापेमारी सुरू केलीये.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Ro-Ro Service: मुंबई -कोकण रो-रो सेवा सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर, तिकीटाचे दर पाहून डोळे फिरतील | VIDEO

Good News: शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत 'बेस्ट' बसने करा मोफत प्रवास

Amboli Recipe: कोकणातली स्पेशल मऊ, लुसलुशीत अन् जाळीदार आंबोळी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Yoga Poses For Hunchback: पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी करा ही 5 योगासने

SCROLL FOR NEXT