Trending Video Saam Tv
व्हायरल न्यूज

अरे देवा! भेटायचं होतं गुपचूप, पण पुराने केला भंडाफोड; नदीच्या पुरात अडकले प्रेमीयुगुल

Girlfriend Boyfriend Stuck in River: सोशल मीडिया म्हटलं की देशभरातील अनेक घटना क्षणात समजत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही तसांच काहीसा आहे. जिथे नक्की काय घडते पाहा.

Tanvi Pol

Trending Video: एकमेकांना भेटण्यासाठी अनेकजण कुठेही जाण्याचं धाडस करतात. पण पावसाळ्यात असे रोमँटिक प्लॅन्स अनेकदा अंगलट येऊ शकतात, सध्या याचं जिवंत उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे. नदीच्या किनारी गुपचूप भेटायला गेलेलं एक प्रेमी युगुल अचानक आलेल्या पुराने अडकून पडलं आणि त्यांची 'रोमॅंटिक डेट' एकदम 'रिस्क डेट' बनली आहे.

हा प्रकार घडलाय गुजरातमधील एका जिल्ह्यात. भर पावसात(Rainy Season) नदीला पूर आलेला असतानाही हे कपल नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एकांतात भेटण्यासाठी गेले. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं. दोघं एकत्र वेळ घालवत होते. पण काही वेळातच पावसाचा जोर वाढला आणि नदीचा पाणीप्रवाह अचानकच वाढला. नदीने रौद्र रूप धारण केलं आणि प्रेमीयुगुल मागे फिरू शकत नाही, इतक्या पाण्यात अडकून पडले.

ज्या क्षणी हे कपल (Couple Video) नदीच्या मधोमध अडकले, त्याच क्षणी तिथे उपस्थित काही स्थानिकांनी ही दृश्यं मोबाईलमध्ये शूट केली. काही वेळातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाण्यात उभं राहून घाबरलेले ते प्रेमीयुगुल, मदतीसाठी आवाज देताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं भीतीचं भाव सोशल मीडियावर पाहून अनेकांना हसू आणि सहानुभूती दोन्ही वाटली

त्यानंतर जवळच्याच गावातील काही तरुणांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथकाने दोरीच्या साहाय्याने या दोघांना बाहेर काढलं. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र दोघेही पूर्णपणे भिजले होते आणि खूप घाबरले होते.

सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. फेसबूक, ट्वीटर(एक्स) शिवाय इन्स्टाग्राम अशा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर अपलोड सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यातच हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील viral_news_here या अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी अपलोड झाला आहे. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''बिचारे, खुप वाईट झालं'' तर अनेकांनी म्हटलं,''आता घरच्यांना समजणार आणि लय मार खाणार दोघं'' अशा असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: प्रेमी युगलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT