
Viral Video: पावसाळा सुरु झाला की पर्यटक मोठ्या प्रमाणात धबधब्यांकडे आकर्षित होतात. निसर्गरम्य वातावरण, वाहणारे पाणी आणि धबधब्यांचा आवाज मन मोहून टाकतो. मात्र अशा ठिकाणी सुरक्षेची काळजी न घेतल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
राज्याच्या एका प्रसिद्ध धबधब्यावर काही पर्यटक (Tourist) पावसाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या पर्यटकांमध्ये काही मित्रांचा ग्रुपही आलेला होता. पाण्यात खेळून झाल्यानंतर सर्वांनी फोटो काढण्याचा निर्णय घेतला. फोटो काढण्यासाठी सर्वजण धबधब्याच्या दगडाला पाठ करुन उभे राहिले. दरम्यान काही क्षणात धबधब्यावरुन दोन तरुणांचा पाय घसरतो आणि ते थेट फोटो काढत असलेल्या तरुणांवर कोसळतात. उंचावरुन पडल्याने फोटो काढत असलेल्या तरुणांना गंभीर दुखापत झालेली दिसू येत आहे.
सर्व भयंकर प्रकार तेथील एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे. नेमकी ही घटना कोणत्या पर्यटन स्थळावरील आहे ते अद्याप समजले नाही. पण काही तासातच ही घटना सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेली आहे. ज्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ऐढवढे नाही तर ही घटना पाहिल्यानंतर प्रत्येकाने यानंतर पावसाळ्यात असो वा अन्य दिवशी पर्यटन स्थळी फिरायला जाताना किती सावधगिरी बाळगळी पाहिजे ते दिसून येत आहे.
नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक आणि हैराण (Shocking) करणाऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की,''पन भावा त्या खाली उभ्या असलेल्या मुलांची काय चुकी होती, ते मस्त फोटो काढत होते ना'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''आज काल मुले आई वडिलांचं चांगले सांगितलं की ऐकून नाही घेत म्हणून असं होत आहे'' असं अनेकांनी म्हटलं आहे.
टीप: हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.