Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : आई कुठे काय करते; बॉलिंग खेळायला गेली आणि थेट टीव्हीच फोडला, VIDEO व्हायरल

Bowling Viral Video : गेम पाहिला असेल. अशात आता सोशल मीडियावर या गेमचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. यामध्ये एका महिलेने गेम खेळण्याच्या चक्करमध्ये तेथील प्रॉपर्टीचं नुरसान केलंय.

Ruchika Jadhav

Bowling Video :

विविध खेळ खेळताना व्यक्ती बऱ्याचदा पडतात, धडपडतात. काही सहासी खेळांमध्ये खेळाडूंना मोठ्या जखमा देखील होतात. आता परदेशात जास्त प्रमाणात खेळला जाणारा बॉलिंग खेळ तुमच्या पैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. काहींनी व्हिडिओमध्ये देखील हा गेम पाहिला असेल. अशात आता सोशल मीडियावर या गेमचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. यामध्ये एका महिलेने गेम खेळण्याच्या चक्करमध्ये तेथील प्रॉपर्टीचं नुकसान केलंय.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आपल्या आईला घेऊन हा गेम खेळण्यासाठी गेमझोनमध्ये आला आहे. येथे आल्यावर त्याने आईला एकदा बॉल कसा थ्रो करायचा ते दाखवले आणि मग त्याची आई खेळू लागली. बॉल अलगद फेकल्यावर तो घसरत समोर ठेवलेल्या बॉटलवर पाडतो. मात्र महिलेने फेकलेल्या बॉलने थेट येथील टीव्ही फुटला आहे.

महिलेला बॉल नेमका कसा फेकावा समज नाही. जिंकण्यासाठी ती वेगात हा बॉल फेकते. त्यामुळे समोर वरती असलेल्या टीव्हीवर तो आदळतो आणि टीव्ही फुटतो. आई पहिल्यांदा खेळणार असते त्यामुळे मुलगा आईचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. त्यामुळे झालेला सगळा प्रकार या मुलाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर @dudettewithsign या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर माझी आई पहिल्यांदा आणि शेवटची बॉलिंग करताना, असं कॅपश्न लिहिलं आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर अनेक हस्यास्पद कमेंट केल्यात. या महिलेने तर सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले, असंही एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Water Cut : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, शुक्रवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

SCROLL FOR NEXT