NABARD Recruitment 2025: महिन्याला ३.८५ लाखांचा पगार, परीक्षा नाही थेट नाबार्डमध्ये नोकरी; अर्ज कसा करावा?

NABARD Grade A Recruitment 2025: नाबार्ड या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार मिळणार आहे. नाबार्डमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
NABARD Recruitment 2025
NABARD Recruitment 2025Saam Tv
Published On
Summary

नाबार्डमध्ये नोकरीची संधी

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर

पगार १.९२ ते ३.८५ लाख रुपये

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचनादेखील जाहीर केली आहे.

नाबार्डमधील या नोकरीसाठी तुम्हाला www.nabard.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

NABARD Recruitment 2025
Indian Oil Jobs: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २७००हून अधिक पदांसाठी भरती

नाबार्डमधील ही भरती आरएमडी, डीओआर, डीडीएमएमबीआय, डीआ.टी, डीईएआर अशा विविध विभागांमध्ये होणार आहे. सरकारी विभागात लाखो रुपये पगाराची नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

या पदांसाठी होणार भरती (NABARD Specialist Officer Recruitment)

नाबार्डमध्ये सध्या स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये अॅडिशनल चीफ रीस्क मॅनेजर, रिस्क मॅनेजर, प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, सिनियर कंसल्टंट, डेव्हलपर, प्रोजेक्ट मॅनेजर, फायनान्शियल अॅनालिस्ट अशा पदांसाठी भरती होणार आहे. एकूण १७ जागांवर ही भरती जाहीर केली आहे.

पगार

नाबार्डमधील या नोकरीसाठी पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. २८ ते ६२ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १.५० लाख ते ३.८५ लाख रुपये दर महिन्याला पगार मिळेल.

कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी (NABARD Job Without Exam)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. इंटरव्ह्यू, शॉर्टलिस्टिंग आणि अनुभवाच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे. सध्या या कॉन्ट्रॅक्टचा अवधी २ वर्षांचा असणार आहे. पुढे हा कालावधी ३ वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

NABARD Recruitment 2025
CBSE Recruitment: सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची संधी;विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

शैक्षणिक पात्रता

नाबार्डमधील नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. अॅडिशनल चीफ रिस्क मॅनेजर पदासाठी ग्रॅज्युएट इकोनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रेजुएट/ स्टेटिक्स/फाइनेंस/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/एमबीए/पीजीडीआई/सीए/सीएससह १० वर्षांची बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव असावा. रिस्क मॅनेजर पदासाठी पोस्ट ग्रेजुएट डिग्री/कॉमर्स/इकोनॉमिक्स/स्टेटिक्स/इकोनॉमिक्स/मैथिमेटिक्स/मैथिमेटिकल स्टेटिक्स/एमबीए/पीजीडीबीए/पीजीडीएम किंवा इंजीनियरिंगमध्ये बैचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. मार्केट रिस्क पदासाठी फायनान्समध्ये ग्रॅज्युएट केलेले असावे. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असावा.

NABARD Recruitment 2025
RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com