- रणजीत माजगावकर
शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय आम्ही कधीच घेणार नाही. आजही आम्ही सहा जागा लढवण्यावर ठाम आहाेत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते माजी खासदार राजू शेट्टी (former mp raju shetti) यांनी स्पष्ट केले. शेट्टींच्या आजच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा स्वाभिमानी राजकीय पटलावर एकला चलाे रे असेच दिसून येते. दरम्यान कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती (shahu maharaj chhatrapati kolhapur) यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे चर्चा करून ठरवणार असल्याचे शेट्टींनी माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केले. (Maharashtra News)
राजू शेट्टी म्हणाले हातकणंगले मधील वंचित उमेदवार हे भाजपचे सक्रिय आहेत. आज देखील भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा वंचितच्या उमेदवाराने दिला नाही. त्यामुळे कुठून काय काय घडलं हे तुम्हाला माहिती झालं असेल असेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा आहे की नाही हे चर्चा करून ठरवणार आहे. शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या भावना वेगळ्या आहेत, कारण शेतकऱ्यांचा प्रश्नावर शाहू महाराज यांनी नेहमी पाठींबा दिला असेही राजू शेट्टींनी नमूद केले. ते म्हणाले महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार दिला तरी कोल्हापूर बद्दल आम्ही विचार करू.
इचलकरंजी शहराच्या पाण्यासाठी मी कधीही विरोध केला नाही असे शेट्टींनी स्पष्ट करत पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे आरक्षण वेगळं असतं. मी पाणी द्यायला पाहिजे हे सांगायला गेलो होतो. त्या फोटोचा विपर्यास केला आणि मला बदनाम केले गेले असेही त्यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.