Animal Hyderabadi Review  saam Tv
व्हायरल न्यूज

Animal Hyderabadi Review:'कई लोगा अम्मा, बहीण भी नवाजते रहे'...; अ‍ॅनिमलचा हैदराबादी रिव्ह्यू ऐकलाय का?

Hyderabadi Review: रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्जवरून सर्वच स्तरातून टीका होत आहे. परंतु इंटरनेटवर एक रिव्ह्यू व्हायरल झालाय. हा रिव्ह्यू ऐकून तुम्ही सर्व दुःख आणि सर्व टीका विसरून जाणार आणि पोट धरून हसू लागणार.

Bharat Jadhav

Bollywood Animal Film Hyderabadi Review:

सध्या रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने जोरदार कमाई करत अनेक चित्रपटांना कमाईत धूळ चारलीय. मोठी कमी करत असतानाच या चित्रपटावरून वाद सुरू झालाय. चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्जवरून सर्वच स्तरातून टीका होत आहे. परंतु टॉलिवूड अभिनेता आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने ‘ॲनिमल’ पाहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं.(Latest News)

या चित्रपटावर प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, तर काही युट्यूब चॅनलदेखील या चित्रपटाची समीक्षा करत आहेत. अशात इंटरनेटवर एक रिव्ह्यू व्हायरल झालाय. हा रिव्ह्यू ऐकून तुम्ही सर्व दुःख आणि सर्व टीका विसरून जाल आणि पोट धरून हसाल. हा रिव्ह्यू एका रीलमधून देण्यात आलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रणबीर कपूरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'अ‍ॅनिमल' चा रिव्ह्यू रीलद्वारे देण्यात आलाय. यात एक महिला अँकर एक रीलमधून हा अ‍ॅनिमल चित्रपट पाहावा की नाही याची माहिती देत आहे. रिव्ह्यू देणारी महिला हैदाराबादी हिंदी भाषेत बोलत असल्याने हा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यातील महिलेने केलेले विनोद इंटरनेट युझर्सच्या पसंतीस उतरत आहे.

व्हिडिओमध्ये, या महिलेने हैदराबादी भाषेत बॉलिवूड चित्रपट अ‍ॅनिमलचा रिव्ह्यू दिलाय. इतक्या मोठ्या चित्रपटाचा रिव्ह्यू या महिलेने अगदी काही वेळात सांगत चित्रपटातील बहुतेक पैलूंचा उलगडा केलाय. रिव्ह्यूचा रील फक्त एक मिनिटाच्या आसपास आहे.

अशी आहे रीलची ओपनिंग -

"ऐसे ज़माने में जिधर ३० सेकेंड का रील को भी तवज्जो दे नहीं देख सकते, वही संदीप रेड्डी वांगा ३.५ घंटे की फिल्म बनके लोगों के सबर का इंतेहां ले रहे हैं.

(ज्या काळात लोक लक्षपूर्वक ३० सेकंदाची रील पाहू शकत नाहीत, अशा काळात संदीप रेड्डी वांगा साडेतीन तास चालणारा चित्रपट बनवून लोकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे.)

दरम्यान 'अ‍ॅनिमल'चा रिव्ह्यू देताना ही महिलेने विक्की कौशलचा 'सॅम बहादूर'चाही उल्लेख करताना दिसते. सॅम बहादूर आणि अॅनिमल एकाचवेळी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपट १ डिसेंबरच्या दिवशी प्रदर्शित झाले परंतु ज्या सिनेमाला लोक वाईट म्हणत आहेत, त्याच सिनेमाला पसंती मिळत आहे. विक्की कौशलचा चित्रपट चांगला राहूनही त्याला प्रेक्षक नसल्याचं रीलस्टार म्हणत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT