viral video twitter
व्हायरल न्यूज

Viral Video: पक्ष्याने तिरंगा फडकवल्याचा तो व्हिडिओ खोटाच! व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर

Bird Unfurls Flag Viral Video Fact Check: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात पक्षी तिरंगा फडकवताना दिसून आला होता. काय आहे व्हिडिओमागचं सत्य? जाणून घ्या.

Ankush Dhavre

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ हे भावुक करणारे असतात. ३ दिवसांपूर्वीच म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी भारतात ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता, ज्यात एक पक्षी ध्वजारोहन करत असताना आला आणि ध्वजारोहण करुन पुन्हा उडून गेला.

सोशल मीडियावर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, 'केरळमध्ये ध्वजारोहण करताना ध्वज अडकला, त्यानंतर एक पक्षी आला आणि त्याने ध्वजारोहण केलं...' असं लिहण्यात आलं होतं. सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ अपलोड झाला, की लोकं त्या व्हिडिओमागची सत्यता कधीच चाचपडून पाहत नाहीत.

काहींना हा व्हिडिओ खरा वाटला. तर काहींनी, या हा पक्षी माजी सैनिक असावा आणि आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आला आहे, असेही म्हटलं. मात्र सत्य काहीतरी वेगळंच आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे, आधी ते समजून घ्या. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु असतो. त्यावेळी एक पक्षी येतो आणि ध्वजारोहण करतो. हे सर्व कॅमेरा अँगेलमुळे झालं असल्याचं दिसून आलं आहे.

कारण याच व्हिडिओचा आणखी १ अँगलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात पक्षी झेंड्याच्या जवळ नाही, तर मागे असलेल्या नारळाच्या झाडावर बसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान झेंडा फडकवताच पक्षी झाडावरुन उडून गेला.

व्हिडिओ खरा असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकरी कुठलाही विचार न करता व्हिडिओ शेअर करत असतात. असंच काहीसं या व्हिडिओच्या बाबतीतही घडलं आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच, हा व्हिडिओ अनेकांना खरा वाटला होता. मात्र दुसरा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना पटलंय की, हा व्हिडिओ खोटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कणकवलीमधून नितेश राणे यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT