Bike Stunt Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bike Stunt Video : बाइक स्टंटच्या नादात मित्राचा पाय मोडला; पाहा थरारक VIDEO

Viral Video : आता सुद्धा सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण बाइक स्टंट करताना दिसत आहेत.

Ruchika Jadhav

तरुण मुलांमध्ये सध्या स्टंट करण्याचं क्रेज सुरू आहे. प्रत्येक मुलगा आणि मुली सुद्धा विविध स्टंट्सचे रील व्हिडिओ शूट करत आहेत. व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या नादात यात आपला जीव सुद्धा जाऊ शकतो याची या मुलांच्या मनात थोडी सुद्धा भीती उरलेली नाही. आता सुद्धा सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण बाइक स्टंट करताना दिसत आहेत.

स्टंटच्या नादात मोडला पाय

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्यावर खाली झोपला आहे. तर त्याचा मित्र त्याच रस्त्यावरून लांबून वेगात बाइकवरस्वार येत त्याच्या दिशेने पुढे येत आहे. आता बाइकस्वार तरुणाला त्याच्या मित्राच्या अंगावर बाइक जाऊ न देता तिथेच बॅलेन्स करत थांबवायची आहे. मात्र अचानक बाइकचा वेग वाढतो आणि ऐनवेळी त्याला ब्रेक लावता येत नाही. ब्रेक न लागल्याने या घटनेत रस्त्यावर असलेल्या तरुणाच्या पायाला दुखापत होते.

बाइकला ब्रेक लागत नाही आणि त्याचं एक चाक तरुणाच्या पायावरून जातं. तसेच बाइक जोरदार उलट पडते. आता बाइक पायावरून गेली म्हणजे पाय फ्रॅक्चर होणारच. या तरुणाचा पाय सुद्धा मोडला आहे. व्हिडिओमध्ये पुढे त्याच्या पायाला प्लास्टर करून व्हिलचेअरवर बसवल्याचं दिसत आहे.

तरुणांच्या या स्टंबाजीचा व्हिडिओ @underrated_.content या इंस्टाग्राम अकाउंट पोस्ट करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या सुद्धा विविध कमेंट आल्यात. नादा पुढे काही नाही ओ शेठ, लोकांच्या कामात टांग घातली की असच होतं, जिवंत आहे की मेला भावा काळजी घेऊन करतं जा, सहा कोटी चुरा झाले असते, अशा पद्धतीने काहींनी या तरुणांची काळजी व्यक्त केली आहे. तर काहींनी बाइकची काळजी व्यक्त हसण्याचे इमोजी यावर पाठवले आहेत.

सोशल मीडियावर आजवर अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. काही दिवसांपूर्वीच ताम्हिणी घाटात सुद्धा स्टंटबाजीच्या नादात एक तरुण पाण्यात वाहून गेला. मित्रांसोबत तो घाटात फिरण्यासाठी आला होती. धबधब्याखाली पाणी वाहत होते, तेव्हा तरुणाने त्यात उडी घेतली. आपण किती सहासी आहोत असं त्याला यातून दाखवायचं होतं, मात्र यात त्याला स्वत:चा जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT