Reel Viral Video x
व्हायरल न्यूज

Viral Video: महागात पडला रील! मास्तरीन बाईंनं पेपर तपासताना बनवला रील; व्हायरल होताच झाली FIR

Bharat Jadhav

आजकाल प्रत्येकाला रील बनवण्याचे वेड लागलंय. मग ते पोलीस असो की शिक्षक. साधारणपणे असे होत नाही की प्रत्येकाचे रील्स व्हायरल होतात, पण एकदे इतके व्हायरल होतं ते रील बनवणारे सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. तर काहींना रील बनवणं चांगलेच महागात पडत असते. असाच काहीसा प्रकार बिहारमधील एका महिला शिक्षिकेसोबत घडलाय. त्यांना गंमतीसाठी रील बनवला या रीलमुळे त्यांच्या थेट पोलीस तक्रार झालीय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका महिला शिक्षिकेचा आहे. यात ह्या शिक्षिका उत्तरपत्रिका तपासताना दिसतायेत. त्यावेळी त्या रील बनवत आहेत. रील बनवताना त्या उत्तरपत्रिकेवरील न बघता थेट मार्ग देत असल्याचं दिसत आहे. हीच गोष्ट अनेकांच्या डोळ्याला दिसली, त्यात व्हिडिओ व्हायरल होताच या शिक्षिकेविरुद्धात तक्रार दाखल झालीय. तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये पाहून शकतात, एक मॅडमही बसल्या आहेत आणि उत्तरपत्रिका तपासताहेत. रीलमध्ये अॅक्ट करताना त्या उत्तरपत्रिकेवरील उत्तर न वाचता गुण देताना दिसत आहेत. विद्यार्थिनीने प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहे की नाही हेही ती तपासत नाहीत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मास्तरीन बाई चांगल्याच गोत्यात आल्या. त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचा दावा केला जातोय. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ChapraZila नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'PPU परीक्षेची कॉपी तपासण्याचे रील इंस्टाग्रामवर व्हायरल झालेत, मॅडमविरुद्ध एफआयआर दाखल झाला'.

सुमारे एक मिनिटाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर ३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजरने लिहिलं की, 'मॅडम जी व्हायरल व्हायचे होते, त्या आता चांगल्याच व्हायरल झाल्या', तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हेही ठीक झाले. प्रत्येक गोष्टीचे रील बनवण्याचे व्यसन लागलंय. त्याचप्रमाणे एका यूजरने लिहिले आहे की, 'ही उत्तरपत्रिका कोणाची असेल त्याला फक्त सरासरी गुण मिळाले असावेत. तुमची प्रत रील्स बनवण्यात वापरली गेलीय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका आहे त्या विद्यार्थ्याने रील बनवण्यात करिअर करावे. कारण चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळतील असे मार्क तुम्हाला मिळाले नसतीलच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT