Marriage Saam TV
व्हायरल न्यूज

Bihar Marriage Viral News: अरेरे! वाजत गाजत धुम धडाक्यात वरात आली, पण नवरदेव नवरीला न घेताच परतला घरी; नेमकं घडलं तरी काय?

Latest News: धुमधडाक्यात वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला नवरीला न घेताच घरी परतावे लागले.

Priya More

Bihar Marriage News: 'मुलगा चांगला दिसत नाही, मला तो अजिबात आवडला नाही. मी त्याच्याशी लग्न (Marriage) करणार नाही' असं सांगून एका तरुणीने लग्नमंडपातच लग्नाला नकार दिला. ही धक्कादायक घटना बिहारच्या (Bihar) भागलपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. नवरीच्या या निर्णयामुळे नवरदेवाकडील नातेवाईकांना मोठा धक्का बसला. धुमधडाक्यात वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला नवरीला न घेताच घरी परतावे लागले.

हे प्रकरण भागलपूरच्या रसाळपूर गावातील आहे. मंगळवारी रात्री धुम धडाक्यात नवरदेवाची वरात आली. लग्नसोहळ्यात सगळीकडे आनंदाचे वातवरण होते. लग्न सुरु असताना वरमाळा घालताना नवरीने नवरदेवाचा चेहरा पाहिला. नवरदेवाचा चेहरा पाहून नवरीने वरमाळा घालण्यास आणि लग्नास नकार दिला. मुलीच्या आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांनी तिची समजूत काढली. ऐवढंच नाही तर त्यांनी हात जोडून तिच्याकडे विनंती सुद्धा केली. तरी देखील नवरीने कोणाचेच ऐकले नाही.

लग्न करण्यास नकार देत नवरी स्टेजवरुन निघून गेली. या नवरीने सांगितले की, 'तो मुलगा माझ्या लायकीचा नाही. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आणि काळा आहे. मला इतक्या मोठ्या मुलाशी लग्न करायचे नाही' नवरीचे हे कारण ऐकून लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांना धक्का बसला. 'जर मी लग्न केलं किंवा कोणी जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं, तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी या नवरीने दिली.

नवरीच्या या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. नवरदेवाच्या वडिलांनी देखील नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीच ऐकले नाही. या घटनेमुळे नवरदेवाला मोठा धक्का बसला. महत्वाचे म्हणजे लग्नासाठी वाजत-गाजत वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला नवरीशिवायच एकटं घरी जावं लागलं. नवरीच्या वडिलांनी सांगितले की, माझी मुलगी असा काही निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं. सध्या या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT