Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! पण यावेळी विषय कौतुकाचा; तरुणाच्या करामतीने नेटकरीही थक्क

Man mimicry Delhi Metro viral video: नको त्या कारणाने नेहमीच चर्चेत येणारे दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओचे पहिल्यांदाच कौतुक होत आहे....
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoSaamtv

Announcement Mimicry Delhi Metro Viral Video: सध्या देशाची राजधानी दिल्लीतील मेट्रो विविध कारणांमुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असून संतापजनक प्रकारामुळे मेट्रो प्रशासनाला जोरदार ट्रोलही केले जात आहे. मात्र सध्या दिल्ली मेट्रोमधील एका तरुणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

ज्यामधील त्याची कला पाहून नेटकऱ्यांनी त्याचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. काय आहे या तरुणाच्या व्हायरल व्हिडिओमागील कथा, चला जाणून घेवू.. (Mimicry Boy In Delhi Metro)

Delhi Metro Viral Video
Bath On Bike: धावत्या दुचाकीवरची ठंडा ठंडा कूल कूल अंघोळ पडली महागात; Video व्हायरल, गुन्हा दाखल

काय आहे व्हिडिओ...

दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सध्या नको त्या कारणांनीच प्रचंड चर्चेत आहे. कधी तरुणांची स्कर्ट घालून एन्ट्री तर कधी प्रेमी युगूलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र सध्या एका तरुणाच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच दिल्ली मेट्रोमधील व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक तरुण दिल्ली मेट्रोच्या ट्रेनबाबत होणाऱ्या निवेदनाची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे. त्याने ही नक्कल अशी काही हुबेहूब केली आहे की, नेटकरीही थक्क झाले आहेत. (Latest Marathi News)

Delhi Metro Viral Video
Viral Video: हातात गुलाब घेत तरुण गुडघ्यावर बसला, पण काही क्षणात मुलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला, पाहा VIDEO

हुबेहूब नक्कल...

या मिमिक्री मॅनचे दोन व्हिडिओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. इंस्टाग्राम (Instagram) यूजर कृष्णांश शर्मा या अकांउटवर हे दोन्ही व्हिडिओ शेअर केले आहेत. कृष्णांश यांनी पहिला व्हिडिओ २ मे पोस्ट केला आहे. ज्याला लोकांचा उत्तम चित्रपट केला आहे. त्यानंतर दुसरा व्हिडिओ त्याने आठवड्यापूर्वी शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो मेट्रोमध्ये प्रवास करताना मेंट्रो अनाउंसरची नक्कल करताना दिसतात.

प्रतिक्रियांचा पाऊस....

दिल्ली आणि लखनऊ मेट्रोमध्ये दुरदर्शनच्या पूर्व प्रेंजेटर आणि व्हॉइस आर्टिस्ट शम्मी नारंग (Shammi Narang) यांचा आवाज आहे तसेच इंग्रजी भाषेतील महिलेच्या आवाजात पूर्व अँकर रिनी सायमन खन्ना यांचा आहे. त्यामुळे त्यांची नक्कल सहजासहजी जमणे अशक्यचं.

मात्र तरीही या तरुणाने अशी काही करामत केली आहे की अगदी हुबेहूब नक्कल त्याला जमली आहे. व्हायरल होत असलेला पहिला व्हिडिओ जवळपास २६ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे जर दुसरा व्हिडिओ जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com