Cobra In Shoes Saam TV
व्हायरल न्यूज

Cobra In Shoes: बुटात लपून बसला होता किंग कोब्रा; पाय टाकताच फना काढला अन्..., थरारक VIDEO व्हायरल

Baby Cobra In Shoe Viral Video: एक किंग कोब्रा साप थेट एका व्यक्तीच्या बुटात सापडला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर सापांचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. अशात एक किंग कोब्रा साप थेट एका व्यक्तीच्या बुटात सापडला आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. बाहेर जाताना सर्व तयारी झाल्यावर अनेक जण घाईघाईत चपला, बुटे घालतात आणि बाहेर पडतात. आता तुम्हीही असं करत असाल तर सावधान. कारण तुमच्याही बुटांमध्ये किंग कोब्रा लपलेला असू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका व्यक्तीच्या बुटांमध्ये किंग कोब्रा लपून बसलेला आहे.

या व्यक्तीने बुट घालण्यासाठी बाहेर काढताच त्यातून किंग कोब्राने डोकं वर काढून फना काढला. भारतीय वन सेवा (IFS)सुंशांत नंदा यांनी ५ ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

एकाने यावर लिहिलंय की, सापाची नवीन चप्पल. तर आणखी एका नेटकऱ्याने यावर भीती व्यक्त केली आहे. सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत सर्व नागरिकांना आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात साप

दोन दिवसांपूर्वी सबसे कातील म्हणून ओळल्या जाणाऱ्या गौतमीच्या कार्यक्रमात देखील सापाने हजेरी लावली होती. नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात साप आढळला होता. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रवाशांची मोठी धांदळ उडाली होती. नागरिकांची पळापळ झाल्यानंतर एका सर्पमित्राने सापाला सुखरूप निसर्ग अधिवासात सोडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT