Thane Viral Video: क्रूरतेचा कळस! सासूला सुनेने केली बेदम मारहाण, VIDEO पाहून येईल संताप

Thane Crime News: क्रूरतेचा कळस! सासूला सुनेने केली बेदम मारहाण, VIDEO पाहून येईल संताप
Thane Viral Video
Thane Viral VideoSaam Tv
Published On

Thane Crime Viral Video:

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने दुसऱ्या एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ज्या महिलेला मारहाण केली जात आहे, ती व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या महिलेची सासू असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे पूर्व येथील सिद्धार्थनगर कोपरी येथे ही घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Thane Viral Video
Parbhani News: दुःखद! परभणीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला वृद्ध महिलेला शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती सासूला घर सोडायला सांगताना दिसत आहे. प्रत्युत्तरात वृद्ध महिलेने तिलाही शिवीगाळ केली. शाब्दिक भांडणामुळे सुनेला राग येत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. (Latest Marathi News)

व्हिडीओत दिसत आहे की, ही क्रूर महिला आधी जाऊन दरवाजा उघडते. नंतर ती अत्यंत क्रूरतेने वृद्ध महिलेला जमनीवर पाडते आणि तिला खेचत दरवाजाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान तिची वृद्ध सासू वेदनेने रडत जमिनीवर पडलेली व्हिडीओत दिसते.

Thane Viral Video
Cheapest Electric Scooters: एका चार्जमध्ये संपूर्ण मुंबई फिरता येईल, जबरदस्त आहे ही इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत फक्त 32500 रुपये

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं घडत असताना स्वयंपाकघरात आणखी एक महिला उभी आहे, जी हे संपूर्ण नाटक पाहत आहे. परंतु ती वृद्ध महिलेच्या मदतीला येत नाही. सीसीटीव्ही फुटेजची तारीख पाहता ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडल्याचे दिसून येते. मात्र नुकताच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ठाणे पोलिसांचे लक्ष वेधलं गेलं आहे.

ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. कोमल ललित दयारामणी (वय 53 वर्ष) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कापूरबावडी येथे काम करतात. कोपरी पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही एफआयआर नोंदवली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत ठाणे शहर पोलिसांनी याप्रकरणी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com