Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अश्विनी ये ना...या गाण्यावर चिमुकल्यानं केला भन्नाट डान्स, अशोक मामांनी देखील केलं कौतुक, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video: अशोक सराफ यांच्या गाण्यावर एका चिमुकल्याने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर केला. त्याचा उत्साह आणि अदाकारी पाहून खुद्द अशोक सराफ यांनीही त्याचे कौतुक केले, ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात, त्यापैकी काही आश्चर्यचकित करणारे असतात, तर काही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण रील्स तयार करत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा अंदाज लावणं कठीण आहे. विशेषतः डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.

सध्या अशाच एका चिमुकल्याचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स चर्चेत आहे. त्याने अप्रतिम एनर्जी आणि उत्साहाने डान्स सादर केला आहे, जो पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे. हा मजेदार आणि मूड फ्रेश करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गंमत जंमत’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये तितकाच ताजा आहे. या चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं आणि आजही ते प्रेक्षकांच्या ओठांवर आहे.

विशेष म्हणजे, हल्लीच्या पिढीलाही हे गाणं तितकंच आवडतं. नुकताच एका चिमुकल्याने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्याच्या उत्साही आणि एनर्जेटिक परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि त्या चिमुकल्याचे फॅन व्हाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांकडून भरभरून प्रेम मिळवत आहे.

या व्हिडिओमध्ये एक चिमुकला आपल्या बाबांच्या कारमध्ये बसून ‘अश्विनी ये ना’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसतो. तो केवळ नाचत नाही, तर मनमोकळा आनंद घेत नाचतो, आणि त्याच्या उत्साहाने त्याचे बाबा देखील हसताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि थेट अशोक सराफ यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांच्या पत्नी, अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिले, “खूप छान बाळा! मी हा व्हिडिओ अशोकना दाखवला आणि त्यांना खूप आवडला.” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे व्हिडिओला आणखी प्रसिद्धी मिळाली असून, नेटिझन्स या चिमुकल्याच्या एनर्जीला भरभरून दाद देत आहेत.

हा व्हिडिओ 'kakade.sanjay' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत २० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी या चिमुकल्याच्या डान्सवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “मला मुलगा झाला तर असाच हवा,” तर दुसऱ्याने लिहिले, “अस्सल मराठी नाणं, कसं खणखणीत आहे याचं उत्तम उदाहरण.” आणखी एका युजरने कौतुक करत म्हटलं, “आजची पिढी ही गाणी ऐकते आणि मनसोक्त आनंद घेते, अजून काय पाहिजे!” या व्हिडिओमुळे जुनी मराठी गाणी आजही लोकांच्या मनात तितकीच जागा टिकवून आहेत, याचा प्रत्यय येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT