ZP School Girls Dance: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. कधी मजेशीर व्हिडिओ, तर कधी टॅलेंटने भरलेला परफॉर्मन्स. त्यातच सध्या असाच एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींनी तेलुगू गाण्यावर दमदार डान्स सादर केला आहे. हा डान्स व्हिडिओ पाहून प्रत्येकजण थक्क झाले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये शाळेतील मुली एनर्जेटिक अंदाजात डान्स सादर करत आहेत. डान्स करत असताना त्यांचे स्टेप्स शिवाय एक्सप्रेशन्स शिवाय टायमिंग इतके परफेक्ट आहेत की डान्स पाहताना प्रत्येकजण थक्क होत आहे. विशेष म्हणजे, हा डान्स ZP शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केला असल्यामुळे तो अधिक चर्चेचा विषय ठरत आहे.
हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकजण तो शेअर करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील rupalisonawane1123 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या डान्स व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहे.
हा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''डान्स असावा तर असा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कमाल डान्स केला आहे'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले,''आजच्या दिवसातील सर्वात भारी व्हिडिओ'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.