Akola Theft Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मंदिरात आला, देवाची माफी मागितली, नंतर चांदीच्या पादुका घेऊन पळाला; चोराच्या अजब कारनाम्याचा VIDEO व्हायरल

Akola Theft Video: अकोल्यामधून एक चोरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मंदिरात आलेला चोर आधी देवाच्या पाया पडतो आणि नंतर चांदीच्या पादुका चोरतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Priya More
  • अकोल्यात मंदिरामध्ये मोठी चोरी

  • चोरट्याने मंदिरात येऊन चांदीच्या पादुकांची केली चोरी

  • आधी देवाच्या पाया पडला, मग माफी मागत केली चोरी

  • घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यात चोरट्याचा अजब कारनामा समोर आला आहे. त्याने आधी देवाची माफी मागितली मग चांदीच्या चरण पादुकांवर डल्ला मारला. बाळापूर तालुक्यातील वझेगाव रामचंद्र महाराज मंदिरात ही घटना घडली. चोरट्याने मंदिरात येऊन आधी पादुकांचं दर्शन घेतलं. हात जोडून देवाची माफी मागितली आणि त्यानंतर चांदीच्या पादुका पॅन्टमध्ये लपवून दुचाकीवरून पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिस या चोरट्याचा शोध घेत आहेत.

अकोल्यातून चोरीची एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. 'आधी चोरट्याने मंदिरातील चरण पादुकांना रीतसर हात जोडत माफी मागितली', अन मग थेट चांदीच्या 'चरण पादुका' चोरल्या. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या वझेगाव रामचंद्र महाराज संस्थान अर्थातच मंदिरात ही घटना घडली. या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये एक अज्ञात चोरटा मंदिरात प्रवेश करताना दिसत आहे. या चोरट्याने आधी 'चरण पादुकांच्या पाया पडल्यात. मग चरण पादुकांवर डल्ला मारला. मात्र, चक्क चोरी करण्याच्या अगदी काही मिनिटं आधी, या चोरट्यानं पादुकांना हात जोडले अन खाली हात मंदिराच्या पायऱ्यापर्यंत परतला. परंतु थोड्या वेळातच तो पुन्हा मंदिरात शिरला अन पादुकांना रीतसर हात जोडत माफी मागितली. त्यानंतर, थेट चरण पादुकाचं पॅन्टमध्ये लपवून तिथून पळ काढला.

आरोपी मंदिराबाहेर पडला आणि दुचाकीवर बसून थेट पळून गेला. हा चोरटा चेहऱ्यावर गमछा बांधून असल्यामुळे चोरची ओळख पटवणे हे अकोला पोलिसांसमोरचे एक मोठे आव्हान बनले आहे. संबंधित पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: कोपर अन् गुडघ्यांचा काळेपणा मिनिटांत दूर करेल 'हा' सोपा उपाय

ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत लुटले सोन्या-चांदीचे दागिने, Video व्हायरल

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले

Rohit Sharma Retirement : रिटायरमेंटच्या अफवांवर रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, नेमकं काय म्हणाला लॉर्ड्स शतकवीर?

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा आदेश; वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात SIT नेमा

SCROLL FOR NEXT