AI in Medical Science Saam Tv
व्हायरल न्यूज

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

AI in Medical Science: एआयच्या मदतीने प्रगत औषधांनी वृद्धत्वाची प्रक्रिया देखील थांबू शकते असा दावा करण्यात आलाय. मग त्यामुळे माणसाचं आयुष्य किती वर्षांनी वाढू शकतं ? कोणी केला आहे हा दावा ? पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

AI in Medical Science: कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच एआयच्या आगमनानंतर, अनेकांना असे वाटू लागले आहे की भविष्यात कर्करोग आणि हृदयविकारांसारखे आजार पूर्णपणे नष्ट होऊ शकतील. त्याही पुढे जाऊन एआयमुळे जर मानवी वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवता आली, तर एखादी व्यक्ती किती काळ जगू शकेल? 100, 200, की 500 वर्षे? या प्रश्नाचे थक्क करणारे उत्तर एका अभ्यासकाने दिले आहे. स्वीडिश तत्त्ववेत्ता आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी प्राध्यापक निक बोस्ट्रॉम यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या विधानामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.

AI च्या मदतीने मानवाचे सरासरी आयुष्य सुमारे 1400 वर्षांपर्यंत असू शकेल, असा दावा त्यांनी केलाय. बोस्ट्रॉम यांनी त्यांच्या 'ऑप्टिमल टाइमिंग फॉर सुपरइंटेलिजन्स' या कार्य-पत्रिकेत ही संकल्पना स्पष्ट केली आहे.

बोस्ट्रॉम यांनी याला पुष्टी देण्यासाठी एक गणितीय प्रारूपही मांडले आहे. त्यांच्या मते AI औषध शोधण्याच्या प्रक्रियेला, रोगांवरील उपचारांना आणि मानवी शरीरात वृद्धत्वामुळे होणाऱ्या हानीला समजून घेण्याच्या प्रक्रियेला लक्षणीयरीत्या वेग देऊ शकते. जर विकसित देशांमधील 20 ते 25 वयोगटातील निरोगी व्यक्तींचा वार्षिक मृत्यूदर सुमारे 0.07टक्के असेल आणि हा धोका वयानुसार वाढत नसेल, तर सरासरी उर्वरित आयुष्य सुमारे 1400 वर्षे इतके असेल, असा दावा निक यांनी केलाय.

हे एखाद्या विज्ञानकथेसारखं वाटत असलं तरी 'अँथ्रोपिक' कंपनीचे सह-संस्थापक डॅरिओ अमोदेई यांनीही असेच भाष्य केले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये समोर आलेल्या एका अभ्यासात AI च्या मदतीने विकसित केलेल्या 'रेंटोसर्टिब' या औषधाच्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली. या औषधाची चाचणी फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर करण्यात आली आहे. 43 रुग्णांमध्ये जैविक वयाच्या निर्देशकांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. मात्र ऑगस्ट २०२६ मध्ये 'नेचर रिव्ह्यूज ड्रग डिस्कव्हरी'मध्ये प्रकाशित संशोधनात असे नमूद करण्यात आले आहे की, जरी AIच्या मदतीने औषध शोधण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली असली, तरी रुग्णांच्या उपचारांवर त्याचा प्रभाव अजूनही मर्यादित आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी नियंत्रणाच्या पलीकडे गेली, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असाही तज्ञांचा इशारा आहे. या दाव्यावरुन एक संदर्भ आठवतो. संत ज्ञानेश्वर महाराजांना वाघावरुन भेटायला आलेले संत चांगदेव महाराज योगसामर्थ्याने १४०० वर्षे जगले, असा उल्लेख आहे. आता आधुनिक जगात एआयच्या मदतीने मानवाला खरच एव्हढं मोठं आयुष्य मिळालं तर त्याचे काय-काय परीणाम होतील? याचाही विचार करणं गरजेचं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

Kolhapur News: कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरतायत मगरी, 15 फुटांच्या मगरीनं भीतीचं वातावरण, ऊसतोडणी मजूरांमध्ये दहशत

Nashik Firing: राज्यात गोळीबाराच्या घटनांचे सत्र सुरूच; निफाडमध्ये गावठी कट्ट्यातून गोळीबार

Maharashtra Farmer: पोट भरण्यासाठी शेतकरी APMC बाजारात, दुष्काळग्रस्तांचे हाल, बळीराजा झाला हमाल

मोठी बातमी! सरकारनं बोलावलं विशेष अधिवेशन; 30 नोव्हेंबरला लोकसभा, २ डिसेंबरला राज्यसभेचं कामकाज, डिलिमिटेशनच्या मुद्द्याची चर्चा?

SCROLL FOR NEXT