A viral video claiming actor Shekhar Suman joined the BJP has sparked debate, prompting a detailed fact-check investigation. saam tv
व्हायरल न्यूज

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Shekhar Suman BJP Joined: एका व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमच्या फॅक्ट चेक या कार्यक्रमातून व्हिडिओची सत्यता तपासली.

Sandeep Chavan

व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत, आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. अभिनेता शेखर सुमनने भाजपात प्रवेश केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरकारवर जोरदार टीका करणाऱ्या शेखर सुमनने अचानक भाजपमध्ये कसा काय प्रवेश केला? हाच अनेकांना प्रश्न पडलाय.त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

या व्हिडिओमध्ये शेखर सुमन विनोद तावडेंच्या उपस्थितीत प्रवेश करत असल्याचं दिसतंय. या व्हिडिओमध्ये ते भाजप कार्यालयातून पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. व्हिडिओच्या मजकुरात असा दावा केला जात आहे की, शेखर सुमन भाजपमध्ये सामील झाले आहेत. व्हिडिओमध्ये, शेखर सुमन अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत आहेत.

आपल्या शैलीतून ते केंद्र सरकारवर टीका करतात. आणि अचानक कसा काय भाजपात प्रवेश केला.असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जातायत.त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ कधीचा आहे? खरंच शेखर सुमनने भाजपात प्रवेश केलाय का? याची आम्ही पडताळणी केली. व्हिडिओ नीट तपासून पाहिला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

शेखर सुमनचा भाजप प्रवेशाचा व्हिडिओ जुना

दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला

शेखर सुमनने भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेला नाही

भाजपवर टीका करत असल्याने शेखर सुमन चर्चेत

.हा व्हिडिओ 2 वर्षे जुना असून, 7 मे 2024 रोजी शेखरने भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपात प्रवेश केल्यानंतर 24 तासातच पक्ष सोडल्याचं शेखरने त्याच्याच कार्यक्रमात सांगितलं होतं.मात्र, आता पुन्हा शेखर सुमनने भाजपात प्रवेश केल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT