Mumbai local train accident saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबईकरांनो सावधान! लोकलमधून पडून मुलीचा मृत्यू झाला, तिथला नवा व्हिडिओ, दृश्य पाहून तुम्ही डोकं धरून बसाल!

Mumbai local train accident: मुंबईत पुन्हा एकदा लोकल ट्रेन अपघाताची घटना घडली आहे. एका तरुणीचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बदलापूर रेल्वे स्टेशनवरील लोकल ट्रेनच्या गर्दीची समस्या पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. ३१ जानेवारी रोजी सकाळच्या धावपळीच्या वेळी बदलापूर स्टेशनवर २८ वर्षीय तरूणीचा लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. ही तरूणी सकाळी ८.१० वाजताच्या लोकलमध्ये चढण्यासाठी धावत असताना तिचा तोल गेला आणि पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बदलापुरसह सेंट्रल रेल्वेच्या अनेक स्थानकांवर गर्दी अशीच भयानक असते. दररोजच्या प्रवासात प्रवाशांना जीवघेणा परिस्थितीचा सामना करावा लागतो. सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची संख्या पाहता ट्रेन सेवा आणि डब्यांची संख्या पुरेशी नाही. शिवाय अनेकदा लोकल गाड्या ३० ते ५० मिनिटं उशीराने धावतात. या स्थितीमुळे प्रवाशांना गर्दीचा भाग व्हालं लागतं. काही वेळा प्रवासी दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.

अपघातानंतर व्हायरल झाला बदलापूर स्टेशनचा व्हिडीओ

बदलापूर तरूणीच्या मृत्यूनंतरही बदलापूर स्टेशनवरील परिस्थिती फारशी बदललेली नाही, हे या व्हायरल व्हिडीओवरून पाहायला मिळतंय. व्हायरल व्हिडीओमध्ये बदलापूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म पूर्ण प्रवाशांनी भरलेला दिसतोय. लोकल येताच ट्रेनमध्ये चढण्यासाठी एकच झुंबड उडते. अनेक प्रवासी आधीच गेटवर लटकून उभे असतात, तर काहींना जण गर्दीमुळे नीट उतरताही येत नाहीत.

ही परिस्थिती पाहता प्रवाशांकडून लोकल फेऱ्या वाढवाव्यात, गर्दीच्या वेळेत विशेष गाड्या सोडाव्यात आणि प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी, अशी सातत्याने मागणी होतेय. नाहीतर बदलापूर स्टेशनवरील गर्दीमुळे असे अपघात पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जातेय.

प्रवासाच्या वाढत्या भारामुळे धोकादायक परिस्थिती फक्त बदलापुरपुरती मर्यादित नाहीये. ठाणे, कल्याण, दादर या सेंट्रल रेल्वेतील इतर स्थानकांवरही गर्दीचा ताण नियमितपणे दिसून येतो. ठाणे स्टेशनवर चढणं आणि उतरणं अत्यंत धकाधकीचं झालं असून प्रवाशांनी याबद्दल वारंवार तक्रारी नोंदवल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glass bottle incident: तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली काचेची बाटली, त्रास होऊ लागल्याने तरूण पोहोचला रूग्णालयात अन्..!

Gadchiroli: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडलं, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: शहादा तालुक्यातील शिरुड गावात हातभट्टीवर पोलिसांचा छापा

Hair Care: उन्हाळा सुरु झाल्यावर केसात अचानक कोंढा वाढलाय? मग आठवडाभर वापरा 'हे' तेल

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा; रविवारी प्रवाशांचे मेगा हाल होणार, कसं असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT