Shocking Incident Video: एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे ७१ वर्षीय वृद्धाने धावत्या रेल्वे समोर झेप घेत जीवन संपवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, या व्हिडीओमुळे प्रत्येकजण हादरला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वृद्धाने केलेल्या या प्रकाराचे कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही, मात्र ही घटना अत्यंत दुःखद आणि अंतर्मुख करणारी ठरत आहे
ही घटना कोणत्या स्थानकावरील आणि कोणत्या शहरातील आहे ते अजून समजू शकले नाही. सीसीटीव्ही (CCTV)फुटेजमधून दिसतं की, एक वृद्ध इसम शांतपणे रुळांजवळ येतो आणि काही क्षण तसाच थांबतो. त्यानंतर अचानक धावत्या रेल्वेसमोर झेप घेतो. हे सर्व काही अवघ्या काही सेकंदांत घडतं आणि पाहणाऱ्या प्रत्येकाला हादरवून टाकणारं ठरतं.
या घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्तीची शारीरिक हालचाल, त्याची स्थिती आणि त्याने घेतलेला निर्णय याचा भयंकर अनुभव मिळतो. इतक्या थंडपणे, कोणतीही गडबड न करता वृद्धाने मृत्यूला सामोरं जाणं हे अनेकांना अंतर्मुख करणारं आहे. या व्हिडीओमुळे सामान्य नागरिकांसह स्थानिक प्रशासन देखील सतर्क झालं आहे
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समाज माध्यमांवर अनेक प्रश्न आणि अनेक प्रकिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कधी काय होईल सांगता येणार नाही'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''नक्की काही कारण असेल या पाठी'' काहींनी म्हटलं,''पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.