Heart Attack Death Saam TV
व्हायरल न्यूज

Heart Attack Death : ऑफिसमध्ये काम करताना हार्ट अटॅक आला, जागीच मृत्यू ; ५ सेकंदाचा थरकाप उडवणारा CCTV व्हायरल

Up Heart Attack Viral Video: सोशल मीडियावर कायम धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एकदा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही वर्षापासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे दुर्देवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंबंधित अनेक मनात धडकी भरवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत कुणाचा लग्नाच्या वरातीत नाचताना तर कोणाचा बाईक चालवताना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.

सध्या अशीच एक घटना उत्तर प्रदेश जिल्ह्यातील महोबातून समोर आली आहे. येथील एका बँकेत काम करत असलेल्या बँक कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात या कर्मचाऱ्याचा काम करत असताना खुर्चीवरच दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही थरारक घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उत्तर प्रदेशमधील महोबा भागात असलेल्या एचडीएफसी बँकेत १९ जून रोजी ही घटना घडली. कुमार शिंदे (वय ३० वर्षे) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते महोबा बँकेत कृषी(agriculture)महाव्यवस्थापक होते. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @@iamsandeeprwt या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही(CCTV) फुटेज दिसते की, सर्व कर्मचारी काम करताना दिसून येत आहे.. कुमार शिंदे हेही काम करताना त्यामध्ये दिसून येत आहे. ते एका खुर्चीवर बसलेले दिसून येत आहे. मात्र काही वेळात त्यांच्या छातीत दुखू लागते. काही क्षणात त्यांचा जागीच मृत्यू होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

SCROLL FOR NEXT