मुंबई : (Father and Daughter marriage video) स्वतःच्या मुलीला लग्न करून सासरी पाठवणे हा प्रत्त्येकच बापासाठी भावनिक क्षण असतो. ज्या मुलीला तळहाताच्या फोडासारखे जपले तिला सासरी पाठवताना सर्वात जास्त दुःख हे बापालाच होते. मुलीलासुद्धा आपल्या वडिलाना निरोप देणे तितकेच अवघड असते. पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ दाखवणार आहोत, ते पाहिल्यानंतर तुमचा देखील यावर विश्वास बसणार नाही. तसेच व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी ज्या निर्लज्जपणाने लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल. वास्तविक, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचा दावा आहे की तिने तिच्या वडिलांशीच लग्न केले आहे. व्हिडिओमध्ये वडीलही तीच्या शेजारी उभे आहेत.
नेमका काय आहे हा प्रकार?
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला जात आहे की तुम्ही दोघे कोण आहात? यावर मुलगी छातीठोकपणे सांगते की ते माझे वडील आहेत आणि आम्ही लग्न करून आनंदी आहोत हे जगाला दाखवून दिले आहे. आमच्या नात्याला कोणीही पाठिंबा देत नव्हता. पण आमचं लग्न झालं आणि आता आम्हाला कुणी पाठिंबा देणं किंवा न देणं याने आम्हाला काही फरक पडत नाही. जेव्हा वडिलांना विचारले जाते, ही तुमची मुलगी आहे का? तर वडील आणि मुलगी एकत्र म्हणतात की हो, मग यात काय अडचण आहे? त्याचवेळी एक मुलगी विचारते, तुला तुझ्या वडिलांशी लग्न करताना थोडी देखील लाज वाटत नाही का? त्यानंतरही दोघांना काही फरक पडला नाही.
उलट मुलीचे वडील म्हणतात, अरे मित्रा, कुठल्या जमान्यात राहतोस? कशाला लाज वाटायची? मुलगी स्वत: सांगत आहे की ती 24 वर्षांची आहे आणि तिचे वडील सांगत आहेत की तो 50 वर्षांचा आहे. व्हिडिओ बनवण्याचे कारण विचारले असता, आम्हाला जगाला सांगायचे आहे, असे मुलीचे म्हणणे आहे.
मुलीचे म्हणणे आहे की लोक आमच्या पाठीमागे आमच्या नात्याबद्दल बोलतात. अशा परिस्थितीत आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्यांना आमच्या नात्याबद्दल सांगायचे आहे. आमचे लग्न हे त्या लोकांना उत्तर आहे जे आमच्याबद्दल वाईट बोलायचे. सोबतच नवरा-बायको सारखे जगण्याच्या प्रश्नावर मुलगी म्हणते की, भांगेत सिंदूर लावल्यानंतरही समजले नाही? निरुपयोगी प्रश्न का? मात्र, ही मुलगी कोण, तिचे वडील कोण, ती कुठली? या सर्व बाबींची माहिती उपलब्ध झालेली नाही. नुकताच जयसिंग यादव यांनी X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. कारण ही TikTok ची क्लिप आहे. अशा परिस्थितीत हे 2020 पूर्वीचे प्रकरण आहे असे म्हणता येईल. मात्र हा व्हिडिओ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला असावा असे दिसते.
अशा परिस्थितीत साम मराठी हा व्हिडिओ खरा की खोटा याची पुष्टी करत नाही. पण एक मात्र नक्की की बाप-मुलीच्या नात्याला अशा प्रकारे बदनाम करणं चुकीचं आहे.
तरीही हा व्हिडीओ खरा असेल तर अशा लोकांना मानसिक उपचाराची गरज आहे. याचे कारण असे की, वडील आपल्या मुलीचे लग्न कसे योग्य ठरवू शकतात? त्याच वेळी, मुलगी देखील वारंवार स्वतःला तिच्या वडिलांची पत्नी म्हणवून घेत आहे. मात्र, हा व्हिडीओ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला असेल, तर त्यांना त्यांच्या उद्देशात नक्कीच यश आले. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ट्विटरवर ते लाखो वेळा पाहिले गेले. त्याचबरोबर शेकडो लोकांनी यावर लाईक आणि कमेंट केल्या आहेत. बहुतेक लोक याला बनावट म्हणत आहेत. पण एका युजरने हिंदू मॅरेज कोडनुसार हे अनाचार आणि बेकायदेशीर आहे, त्यामुळे देशाच्या कायद्यानुसार हा विवाह अवैध आहे, असे परमजीतने लिहिले आहे.
Edited By- नितीश गाडगे
(व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.