Fake Medicines: आता QR कोड स्कॅनच्या मदतीने काही सेकंदात ओळखता येणार औषध खरे की बनावट, पाहा डिटेल्स

Identify Fake Medicine with help of QR code : जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला औषध घ्यावे लागते.
Fake Medicines
Fake MedicinesYandex
Published On

जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला औषध घ्यावे लागते. परंतु आपण बरे होण्यासाठी जे औषध घेत आहात तेच खोटे निघाले तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? याची संपुर्ण माहिती जाणून घेणे खूप आवश्यक असते. नाहीतर याचा वाईट परिणाम तुमच्यावर होऊ शकतो.

आजकाल विविध प्रकारचे आजार पसरत आहेत. साधी सर्दी झाल्यास, लोक मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करतात. मात्र लोकांसाठी हे खूप महाग ठरू शकते. औषधे घेण्यापुर्वी जाणून घ्या की, जर तुमच्या औषधाच्या पॅकेजिंगवर चिन्ह नसेल तर ते बनावट असू शकते. चला जाणून घेऊया बनावट औषधे कशी ओळखायची.

ऑनलाइन किंवा मेडिकल स्टोअरमधून औषध खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, जेव्हाही तुम्ही औषध खरेदी करायला जाल तेव्हा त्यावर छापलेला QR कोड तपासला पाहिजे. जर औषधावर QR कोड नसेल तर ते बनावट असू शकते.

Fake Medicines
Sesame Seeds: २१ दिवस रोज १ चमचा तीळ खा; तुम्ही विचारही केला नसेल इतके होतील आश्चर्यकारक फायदे

QR कोड स्कॅनवर सर्व माहिती उपलब्ध होईल

QR कोड हा एक विशेष प्रकारचा अद्वितीय कोड आहे, जो एका स्कॅनमध्ये औषधाशी संबंधित सर्व माहिती देतो. तुम्ही हा QR कोड तुमच्या डिव्हाइस किंवा मोबाईल फोनने स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या उपकरणातील औषधाशी संबंधित सर्व माहिती मिळेल. नियमानुसार १०० रुपयांच्या वरच्या सर्व औषधांना क्यूआर कोड असणे आवश्यक आहे आणि जर ते नसेल तर ते औषध खरेदी करू नये असा सल्ला देण्यात आला आहे.

बनावट QR कोड बनवणे खूप कठीण आहे

वास्तविक, हा QR कोड एक प्रगत आवृत्ती आहे. ज्यामध्ये केंद्रीय डेटाबेस एजन्सीकडून माहिती प्रविष्ट केली जाते. प्रत्येक औषधाच्या पानावर किंवा पॅकिंगवर वेगळा QR कोड असतो, त्यामुळे हा कोड कॉपी करणे खूप अवघड असते. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही औषध खरेदी करता तेव्हा हा QR कोड नक्की तपासा, कारण बनावट औषध तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

Fake Medicines
Who Can wear Gold: सोने परिधान करणे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही! ग्रहही रागवतात, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रज्ञ काय सांगतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com