16 Foot Python Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Python Viral Video: बापरे, बाप! घरावर फिरतोय १६ फुटाचा अजगर.. आरडा-ओरडा अन् किंचाळ्या; अंगावर काटा आणणारा VIDEO

16 Foot Python Viral Video: घराच्या छतावर तब्बल १६ फुट लांब अजगर आढळला, ज्यानंतर लोकांची, लहान मुलांची भितीने गाळण उडाली.

Gangappa Pujari

Python On Roof Of House Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला एका पेक्षा एक भयंकर व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकांची भितीने गाळण उडते. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

हा व्हिडिओ आहे एका महाकाय अजगराचा. एका घराच्या टेरेसवर तब्बल १६ फुट लांब अजगर आढळला, ज्यानंतर लोकांची, लहान मुलांची भितीने गाळण उडाली. काय आहे ही व्हायरल स्टोरी, जाणून घेवू सविस्तर... (Huge Python Climbing on the Roof Video)

घरावर १६ फुटाचा अजगर...

जगभरात सापांच्या (Snakes) अनेक प्रजाती आहेत. ज्यामधील काही साप खूपच विषारी आहेत की त्याने दंश केल्यास जीव वाचणे अशक्यच असते. अशा महा भयंकर सापांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहून भल्याभल्यांची भितीने गाळण उडते.

सध्या पावसाळ्याचे (Rain) दिवस असल्याने अनेक ठिकाणी सापाचे दर्शन होते. सध्या असाच एका महाकाय अजगराचा व्हिडिओ समोर आला आहे. एका घराच्या टेरेसवर तब्बल १६ फुटाचा अजगर फिरत असल्याचे लोकांना दिसले. इतका महाकाय साप पाहून चिमुकली मुले रडायला लागली.

लोकांची उडाली घाबरगुंडी...

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या टेरेसवरुन हा महाकाय अजगर पुढच्या झाडाकडे सरकत आहे. टेरेस आणि झाडामधील मोकळ्या जागेतून पुढे सरकताना हा अजगर इतका भयंकर दिसतोय, की पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे. इतका मोठा साप इमारतीवर गेला कसा? हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

सापाला पाहून बघणारी चिमुकली मुले घाबरुन गेली असून रडायलाही लागली. बघणाऱ्या लोकांपैकी काही जणांनी हा सापाचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियामधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया...

ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला असून त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही जणांनी ऑस्ट्रेलियामध्ये असे साप सर्रास दिसत असल्याचे सांगितले आहे. तर एका नेटकऱ्याने अशा सापांच्या भितीनेच मी ऑस्ट्रेलियामध्ये राहत नसल्याची कबुली दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT