mumbai local news  saam tv
Video

Accident News: चालती लोकल पकडण्याच्या नादात तरुणासोबत भयंकर घडलं, तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधोमध अडकला, अन्...|VIDEO

Mumbai Local News: लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी चालती लोकल पकडणे अंबरनाथच्या एका प्रवाशाला चांगलेच महागात पडलेे आहे. कारण तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलच्यामध्ये हा प्रवासी अडकल्यामुळे हा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

Omkar Sonawane

मुंबई लोकलमधील अपघात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अंबरनाथवरून सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते. ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत असताना एक प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढायला गेला. मात्र लोकल वेगात असल्याने त्याला लोकलमध्ये चढता आलं नाही आणि तो घसरून थेट प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये जाऊन पडला आणि त्याच्यावरून २ ते ३ डबे पुढे गेले. या अपघातात हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून आरपीएफने त्याला बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र जागा पकडण्यासाठी प्रवासी करत असलेली घाई कशी जीवावर बेतू शकते हे या निमित्ताने पुढे आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT