Chhatrapati Sambhajinagar Crime News 
Video

Sambhajinagar : शिवजयंती सोहळ्यात लॉरेन्स बिश्नोईचं पोस्टर, संभाजीनगरात तरूणाला ठोकल्या बेड्या|VIDEO

Chhatrapati Sambhajinagar Crime News : शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकावणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकावणाऱ्या तरुणास क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. दर्शन ऊर्फ विशाल श्याम पवार साळुंखे असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. क्रांती चौक येथे शिवजयंतीच्या सोहळ्यात त्याने धर्मो धर्म रक्षित असे लिहून त्याखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. याबाबत माध्यमांनी टीकेची झोड उठवल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे. या पोस्टरबाजीवर सर्वच स्तरातून प्रचंड संतप्त प्रतिक्रिया समोर येत होत्या. राज्यभरात हे प्रकरण जोरदार गाजलेले बघायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्यात एका कुख्यात गैंगस्टरचे उदात्तीकरण कसे केले जाते? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्याचबरोबर दुर्लभ कश्यपनंतर आता शहरात नव्या गुन्हेगाराची फॅन फॉलोइंग तयार होत आहे का ? असाही प्रश्न निर्माण होत होता. ("Chhatrapati Sambhajinagar: Police Arrest Man for Displaying Gangster Lawrence Bishnoi's Poster During Shivaji Maharaj Celebrations"

)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT