पाणीटंचाई saam tv
Video

Yavatmal News: मंत्री साहेब इथंही लक्ष द्या! घोटभर पाण्यासाठी माय माऊलींची जीवघेणी पायपीट|VIDEO

Drinking water issues in Maharashtra: सध्या राज्यात नागरिकांच्या अनेक समस्या असताना राजकीय मंडळी ही जात,धर्म आणि भाषा याचं राजकारण करताना पाहायला मिळत आहे. मात्र, कडकलेल्या उन्हात अनेक ठिकाणी पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करत आहे.

Omkar Sonawane

संजय राठोड,साम टीव्ही

यवतमाळ: पाणी हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. मात्र आजही यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या कारेगाव फासे पारधी बेड्यातील महिला पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करत आहेत. या महिलांना दररोज काही किलोमीटर अंतर पार करत जीव धोक्यात घालून पाणी आणावं लागतं.

शासनाच्या विविध जलयोजना केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचं वास्तव या भागात दिसून येतं. प्रत्यक्षात या सुविधा अजूनही या समुदायापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. रोज दोन ते तीन किलोमीटर अंतर चालून पाणी आणावं लागतं. उन्हाच्या तडाख्यात अंग भाजतं, तरीही पर्याय नाही. खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागतं, आणि त्या वेळी साप-विंचवांचा धोका असतोच.

या दुष्काळी परिस्थितीत, दूषित पाणी प्यावे लागल्यामुळे लहान मुलांसह मोठी माणसं वारंवार आजारी पडत आहेत. स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT