Kalyan Dombivali:ऐकावं ते नवलंच! कल्याण - डोंबिवलीमध्ये पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Water Pollution: कल्याण डोंबिवली शहरात पिवळसर पाण्याचा पुरवठा होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Water Purification
Water Purificationsaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

कल्याण येथील उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ही जलपर्णी काढताना नदीतील पाणी ढवळले जात असल्याने नदीतील पाण्याचा रंग पिवळसर झाला असून या पाण्याला काहीशी दुर्गंधी देखील सुटली आहे. पाणी पिवळसर रंगाचे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे . केडीएमसी प्रशासनाने पाण्यावर केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुरेशा क्लोरीनच्या प्रक्रिया केल्यानंतरच हे पाणी पुरवले जात आहे असे सांगितले. पाण्याचा रंग पिवळसर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाणी गाळून व उकळून प्यावे अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे.

Water Purification
ये पप्पा, ये पप्पा म्हणाली...; पोटच्या लेकीचा मृत्यू, आई बापाचा काळीज चिरणारा आक्रोश, अख्खं सोलापूर हळहळलं

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या उल्हास नदीत जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणावर पसरला असून, जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मशिनरीच्या साहाय्याने काम हाती घेतले आहे. या प्रक्रियेमध्ये जलपर्णी मुळासकट उपटून काढताना जलपर्णीच्या मुळाशी साचलेला गाळ ढवळून निघत असल्याने नदी पात्रातील पाण्याचा रंग गडद पिवळसर झाला आहे. एकीकडे जलपर्णी काढतानाच प्राधिकरणाच्या उकेंद्रातून पाण्याची उचल सुरु आहे. यामुळे जल शुद्धीकरण केंद्रात गढूळ पाणी वाहून नेले जात आहे. त्यामुळे पाणी पिवळसर झाले असून पाण्याला थोडासा वास येतोय.

Water Purification
Mumbai MHADA : मोठी बातमी! मुंबईत म्हाडाच्या ९५ इमारती अती धोकादायक, नोटीस धडकणार

उल्हास नदीतून जलपर्णी काढण्यास सुरुवात झाल्यानंतर आज शहराच्या अनेक भागात पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सोशल मिडीयावर नागरिकाकडून सुरु झाल्या आहेत. अनेक भागात पिण्याचे पाणी फिल्टर केल्यानंतरही पिवळसर रंगातच राहत असल्याने नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Water Purification
Ulhasnagar: "ए डीजेवाल्या गाणं लाव" हळदीत डीजे वेळेत बंद केल्यामुळे वाद; DJ ऑपरेटरच्या डोक्यात दगडच घातला

याबाबत केडीएमसी प्रशासनाने महापालिकेच्या बाराव्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा योग्य ठेवून पाणी शुद्ध केलं जात आहे. मात्र पाण्याचा कलर पिवळसर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाणी गाळून उकळून वापरण्याची खबरदारी घ्यावी असा आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून प्रसिद्ध पत्र काढण्यात आले आहे तसेच जागोजागी रिक्षामध्ये अनाउन्समेंट करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com