KDMC Commissioner: कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून IAS अभिनव गोयल यांची नियुक्ती

KDMC Commissioner IAS Abhinav Goel: कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी याआधी हिंगोलीत काम केले आहे.
KDMC Commissioner
KDMC CommissionerSaam Tv
Published On

अभिजित देशमुख; साम टीव्ही प्रतिनिधी

आयएएस अभिनव गोयल हे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काम पाहणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल हे सध्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. आता ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. त्यांनी हिंगोलीत खूप चांगले काम केले आहे. त्यानंतर आता त्यांची नियुक्ती कल्याण-डोबिंवली महानरपालिकेत झाली आहे. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

KDMC Commissioner
Success Story: वडिलांची अपूर्ण इच्छा मुलीनं केली पूर्ण, कल्याणची स्नेहा न्यायाधीश झाली; वाचा यशाची कहाणी

काही दिवसापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची पालघर जिल्हा अधिकारी कधी बदली करण्यात आली. त्यानंतर आयुक्त पद हे रिक्त होते. या रिक्त पदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आज शासनाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी गोयल यांची वर्णी लावली आहे. त्यांनी त्वरित आयुक्त पदाचा चार्ज घ्यावा असेही बदली पत्रात म्हटले आहे.

KDMC Commissioner
Success Story: सादागड-हेटी गावातील नागरिकांना वीजबिल येतं शुन्य; बनलं राज्यातील पहिले 'सौर ग्राम'

कल्याण डोंबिवली महापालिकेत बेकायदा बांधकामांचा प्रश्न आहे. बेकायदा बांधकाम तोडणे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. आर्थिक स्थिती सुधारणे. महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ही विकास कामे मार्गी लावणे हे प्रमुख आवाहने नव्या महापालिका आयुक्तांच्या समोर राहणार आहेत. नवे आयुक्त गोयल हे प्रशासनाचा कारभार कशाप्रकारे चालवतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

KDMC Commissioner
Success Story: भाड्याच्या घरात आयुष्य गेलं, दिवसरात्र मेहनत करुन क्रॅक केली UPSC; IAS अंजली अजय यांना प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com